जेजुरी : महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या खंडेरायाचा गाभारा विजयादशमीनिमित्त आकर्षक फुलांनी सजवण्यात आला होता. धार्मिक विधींना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास प्रारंभ करण्यात आला. मोजक्या मानकरी ,पुजारी ,ग्रामस्थांच्या वतीने श्रींची पूजा, अभिषेक, भूपाळी, आरती झाल्यानंतर बालद्वारीतील घट उठवण्यात आले. त्यानंतर उत्सवमूर्ती भांडारगृहात मांडण्यात आल्या.
सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास प्रमुख विश्वस्त पंकज निकुडे, मुख्याधिकारी राजेंद्र जगताप पुण्यातील पेशवे परिवाराच्या वतीने ध्वज पूजन ,नगारापूजन ,श्रींचे सुवर्णअलंकार ,दानपेटी ,व खंडापूजन करण्यात आले.