कोरेगाव भीमा: येथील ग्रामपंचायत निवडणुकीत आठ जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. आज झालेल्या निवडणूकीत गावामध्ये जय मल्हार पॅनेलचे ११ तर भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलचे सहा जागांवर सदस्य निवडून आले आहेत. मात्र गेले दोन पंचवार्षीक निवडणूकीचा इतिहास पाहता सरपंच कोणत्या पॅनेलचा होणार याबाबत ग्रामस्थांमध्ये उत्सुकता आहे.
शिरुर तालुक्यात संवेदनशिल असलेल्या कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडूकीत अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी विरोधी उमेदवारांनी माघार घेतल्याने जय मल्हार पॅनेलचे केशव फडतरे ,अनिकेत गव्हाणे, विक्रम गव्हाणे, सविता घावटे, शैला फडतरे, शिल्पा फडतरे , अर्चना सुपेकर तर भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलच्या वंदना गव्हाणे या बिनविरोध निवडून आल्या होत्या.
१७ सदस्य असलेल्या ग्रामपंचायत मध्ये आठ जागा बिनविरोध निवडून आल्या असुन १५ जानेवारी रोजी झालेल्या ९ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत वार्ड क्रमांक १ मध्ये महेश ढेरंगे यांनी माजी उपसरपंच जितेंद्र गव्हाणे यांचा २५६ मतांनी पराभव केला तर माजी उपसरपंच दत्तात्रय ढेरंगे यांचा माजी सरपंच संदिप ढेरंगे यांनी ५७ मतांनी पराभव केला आहे. तर वार्ड क्रमांक ५ मध्ये अमोल शहाजी गव्हाणे यांना नागनाथ गव्हाणे व मनोज ढेरंगे यांनी तर जयश्री दिपक गव्हाणे यांना रोहिनी अविनाश गव्हाणे यांनी पाठिंबा दिला असल्याने या दोन जागांची औपचारीक निवडणूक लागली होती. तर मनिषा संपत गव्हाणे यांनी राजश्री महेंद्र भांडवलकर यांचा मतांनी पराभव केला होता.
सरपंच कोणाचा होणार
कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीवर गेली दहा वर्षे भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलची सत्ता येवूनही विरोधी पॅनलचे सरपंच व उपसरपंच झाले असल्याने सत्ता येवूनही विरोधी पॅनलला सत्तेची फळ चाखायला मिळाली होती. आज जय मल्हार पॅनेलचे ११ सदस्य निवडून आले आहेत तर भैरवनाथचे सहा सदस्य आहेत. मात्र दहा वर्षाचा इतिहास पाहता सरपंच कोणाचा होणार याबाबत ग्रामस्थांमध्ये उत्सुकता लागली आहे.
वार्ड क्रमांक १ - महेश ढेरंगे विजयी (८१९) विरुध्द जितेंद्र गव्हाणे पराभूत (५६३)
गणेश कांबळे विजयी (६९६) विरुध्द बाळासाहेब भालेराव पराभूत(६७३), कोमल खलसे विजयी(७०८) विरुध्द संध्या शिंदे पराभूत(६६३)
वार्ड क्रमांक ५ : अमोल गव्हाणे विजयी ९०४ मते
जयश्री गव्हाणे विजयी ८९४ मनीषा गव्हाणे विजयी ६५६ विरुध्द पराभूत राजश्री भांडवलकर ३३६ मते
वार्ड क्रमांक ६ : संदिप ढेरंगे ५९४ विजयी विरुध्द दत्तात्रय ढेरंगे ५३७ पराभूत, शरद ढेरंगे ५६७ विजयी विरुध्द धनाजी ढेरंगे ५५३ पराभूत
रेखा ढेरंगे ५६८ विजयी विरुध्द मोनिका ढेरंगे ५५८ पराभूत.
१८ कोरेगाव भीमा