पुणे : जुन्या वास्तू आहे तशा पुनर्स्थापित करताना अनेक अडचणी येतात़. मात्र दीड वर्षात जयकर बंगल्याचे जुने व नवे रूप या ठिकाणी पुनर्स्थापित केले आहे़. राष्ट्रीय फिल्म संग्रहालय (एनएफएआय) येथील बॅरिस्टर जयकर यांचा बंगला हा चित्रपट रसिकांकरिता प्रेक्षणीय ठरेल, असा विश्वास केंद्रीय माहिती व प्रसारण तथा पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला़. एनएफएआयच्या परिसरातील जयकर बंगल्याच्या डागडुजीनंतरच्या पुनर्स्थापित बंगल्याचे उद्घाटन जावडेकर यांच्याहस्ते केले. यावेळी संग्रहालयाचे संचालक प्रकाश मुकदूम, सीसीडब्ल्यूचे मुख्य अभियंता जगदीश भगत, जयकर यांच्या पणती प्रसन्ना गोखले उपस्थित होते़ .जावडेकर म्हणाले, बॅरिस्टर जयकर यांचे पुणेविद्यापीठाशी अद्वितीय नाते होते़. त्यांचा हा बंगला अनेक सार्वजनिक कार्यासाठी उपयोगात आला़. अनेक संस्थाच्या ताब्यातून शेवटी तो फिल्म संग्राहलयाच्या ताब्यात आला़. परंतू या बंगल्याच्या डागडुजी गरज होती, म्हणूनच उत्तमरित्या त्याची पुर्नबांधणी आहे त्या पध्दतीने केली आहे़. जयकर बंगल्यात डिजीटल लायब्ररी असून, कुठल्याही चित्रपटविषयी डिजीटल माहिती येथे उपलब्ध आहे़ बंगल्यामध्ये चित्रपट पाहण्यासाठी विशेष दालनेही आहेत़. हा बंगला एक प्रेक्षणीय ठिकाण बनला असून, जुने रूप व नवे रूप याचे वास्तू पुर्नस्थापनेच्या वेळी उत्तमरित्या मेळ घातला आहे़. पुण्याच्या कला व स्थापत्य क्षेत्रात जयकर बंगल्याला विशेष स्थान निर्माण झाले असून, चित्रपट संशोधकांच्या हितासाठी याचा मोठा उपयोग होणार असल्याचे जावडेकर यांनी सांगितले़. यावेळी जावडेकर यांच्याहस्ते बॅ़ जयकर यांच्या पणती प्रसन्ना गोखले यांचा विशेष सत्कार केला़.
...कार्यक्रमस्थळाहून काढता पाय घेतलामुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेकरिता पुण्यातील काही रस्त्याच्या कडेची झाडे तोडली. सर्व शहर फेल्क्सने विद्रुप झाले़ याबाबत पत्रकारांचा प्रश्न विचारणे पूर्ण होण्यापूर्वीच प्रकाश जावडेकर यांनी, नाही़. म्हणून कार्यक्रमस्थळाहून काढता पाय घेतला. तसेच याबाबतच्या कोणत्याही प्रश्नावर भाष्य करण्याचे टाळले़. एरव्ही पुण्यात आल्यावर आवर्जून पर्यावरण विषयावर भाष्य करणारे जावडेकर मात्र आज मौन बाळगून राहिले़. --