पुणे : शेतकरी व लहान व्यावसायिक प्रामाणिकपणे कर्ज परतफेड करतात. परंतु बड्या कर्जदारांच्या थकबाकीमुळे बँका अडचणीत आल्या आहेत आणि हे देशासमोरील मोठे आव्हान आहे, असे मत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी येथे व्यक्त केले.पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा शताब्दी वर्ष सांगता सोहळा येथे पार पडला. या वेळी जेटली बोलत होते. कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकारमंत्री सुभाष देशमुख, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, उपाध्यक्षा अर्चना घारे, संचालक अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, राज्यमंत्री दिलीप कांबळे, सहकार अपर सचिव एस. एस. संधू,जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते, खासदार सुप्रिया सुळे, वंदना चव्हाण, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, बँकेचे सर्व संचालक, पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.जेटली म्हणाले, ‘‘शताब्दी वर्षे पूर्ण करणाºया पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा एन. पी. ए. शून्य टक्के आहे. बँकेचे ग्राहक, शेतकरी प्रामाणिक पणे कर्ज परतफेड करत असल्यानेच बँकेचा विकास झाला आहे. जिल्हा बँकेने आपल्या ग्राहकांचा विश्वास कमावला, यामुळेच प्रगती होऊ शकतील. देशातील सर्व बँकांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा आदर्श घेतल्यास देशाचा विकास होण्यास मदत होईल.’’शरद पवार म्हणाले, ‘‘आज अनेक राष्ट्रीयीकृत बँका सर्वसामान्य व शेतकºयांना दारातदेखीलउभे करत नाही. कर्ज दिलेच तर वसुलीसाठी मात्र लेगच शेतकºयांच्या दारात हजर होतात. त्यामुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला व शेतकºयाला खºया अर्थाने सक्षम करण्यासाठी सहकारी बँका, विविध कार्यकारी सोसायट्याने पाठबळ देण्याची गरज आहे़’’विविध कार्यकारी सोसायट्यांनी कर्जवाटप न करता व्यापारी तत्त्वावर काम करण्याची गरज आह, असे मत सुभाष देशमुख यांनी व्यक्त केले.या वेळी अजित पवार, बँकेचे व्यवस्थापकीय संचालक संजय भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. शरद पवार यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाल्याने बँकेच्या वतीने अरुण जेटली यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.देवेंद्र फडणवीस म्हणाले, येत्या आॅक्टोबर महिन्यात शेतकºयांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करणार आहे. शेतकºयांची दिवाळी गोड करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. परंतु केवळ कर्जमाफी करून शेतकरी सक्षम होणार नाही, तर शेतीमधील गुंतवणूक वाढली पाहिजे व शेतीमालाचा पुनर्वापर व मार्केटिंगदेखील करण्याची गरज आहे. यासाठी शासनाकडून विविध उपाय-योजना राबविण्यात येत आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेप्रमाणे शेतकºयांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्याची गरज आहे. तसे झाल्यास शेतकरी उभा राहील. सहकारी बँका सक्षम करण्यासाठी योग्य पावले उचलली जाणार आहे. या माध्यमातून सहकार चळवळदेखील अधिक सक्षम होईल.
बड्यांच्या थकबाकीमुळे बँका अडचणीत : जेटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 2:22 AM