ही योजना गावात व्हावी अशी मागणी अनेक दिवसांपासून होती, त्याबाबत पाठपुरावा आंबेगाव-शिरूर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर व शिरूर पंचायत समितीचे माजी सभापती विश्वास कोहकडे यांनी गावच्या शिष्टमंडळासोबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केल्यानंतर त्यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र राज्य जीवन प्राधिकरण कार्यकारी अभियंता एम. एन. भोई, उपअभियंता राजश्री पवार, शाखा अभियंता एम. डी. देशपांडे, एस. एम. राऊत यांनी कारेगाव येथे येऊन समक्ष पाहणी केली. या वेळी सरपंच निर्मला नवले, उपसरपंच अजित कोहकडे, ग्रा. प. सदस्य संदीप नवले, उद्योजक शुभम नवले, संदीप गवारे, ग्रामविकास अधिकारी एस. बी. भाकरे तसेच कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
सरपंच निर्मला नवले यांनी पथकाला माहिती देताना सांगितले की, जलजीवन मिशन योजने अंतर्गत ग्रामपंचायतीच्या वतीने स्वतंत्र नवीन नळपाणी पुरवठा योजनेचा गावाचा कृती आराखडा प्रस्ताव महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे सादर केलेला आहे. सध्या एमआयडीसीतील कामगार व अधिकाऱ्यांच्या वास्तव्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरीकरण वाढून लोकसंख्या वाढली आहे.
--
चौकट
पंधरा वर्षांचा विचार करून योजना राबविणार
सध्या रांजणगाव एमआयडीसीतून दररोज फक्त ९ लाख ६२ हजार लिटर पाणीपुरवठा मंजूर आहे, वास्तविक या वाढत्या लोकसंख्येचा विचार केला तर दररोज सुमारे १९ लाख ५० हजार लिटर पाण्याची आवश्यकता आहे.तसेच भविष्यात पुढील १५ वर्षांच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करता दररोज हाच पाणीपुरवठा २४ लाख ७५ हजार होणे अपेक्षित आहे. वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात सध्या एमआयडीसीकडून होणारा पाणीपुरवठा कमी पडत असल्याने नागरिकांची पाण्याअभावी मोठी गैरसोय होत आहे आणि ती गैरसोय टाळण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने नवीन स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती सरपंच नवले यांनी सांगितले.
–------------------------------------------
फोटो क्रमांक :
फोटो : कारेगाव येथे प्रस्थापित नवीन पाणीपुरवठा योजना सर्वेक्षण करताना अधिकारी.