सुपे : बारामती तालुक्यातील उंडवडी कडेपठार येथे जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजनेतून हक्काचे पाणी सोडावे. या मागणीसाठी शेतकऱ्यांनी तिस-या दिवशी बहुसंख्य महिलावर्ग आणि शेळ्या-मेंढ्यांसह आंदोलन केले. जोपर्यंत पाणी मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची भूमिका आंदोलकांनी घेतल्याने अधिकारी आणि शेतकरी यांच्यातील चर्चा निष्फळ ठरली.गुरुवारपासून बारामती-पाटस रस्त्यावरील बस स्थानकाजवळ जनाई-शिरसाईचे पाणी सोडण्यासंदर्भात चक्री उपोषण सुरू केले आहे. शुक्रवारी आंदोलनाचा दुसरा दिवस होता. या वेळी शेतक-यांनी जागरण-गोंधळ घालून चक्री उपोषण केले. शनिवारी तिसºया दिवशी महिलांसह शेळ्यामेंढ्या उपोषण स्थळी आणल्या होत्या.दरम्यान, या योजनेचे कार्यकारी अभियंता महेश कानेटकर, उपअभियंता ए. एल. राऊत यांनी शुक्रवारी शेतकºयांशी संवाद साधला. मात्र, चर्चा निष्फळ ठरली. तर, शनिवारी प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसीलदार हनुमंत पाटील यांनी उपोषणस्थळी भेट दिली. मात्र, शेतक-यांशी संवाद न साधताच ते निघून गेल्याने उपोषणकर्ते चिडले असल्याने उपोषण तीव्र होण्याचे संकेत आहेत.या शेतक-यांना पाठिंबा देण्यासाठी उंडवडी क.प., जराडवाडी, उंडवडी सुपे, सोनवडी सुपे, नारोळी, कोळोली, देऊळगाव रसाळ, सुपे, गोजुबावी, कारखेल, साबळेवाडी, अंजनगाव, बºहाणपूर, काळखैरेवाडी आदी गावांतील शेतकºयांनी उपोषणस्थळी येऊन पाठिंबा दिल्याची माहिती उंडवडी कडेपठारचे माजी सरपंच विठ्ठल जराड यांनी दिली.पाण्याच्या नियोजनाची मागणी...बारामतीच्या जिरायती पट्ट्यात यंदा पाऊस नसल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी व चारा टंचाई निर्माण झाली आहे. टंचाईच्या पार्श्वभूमीवर या भागाला वरदान ठरत असलेल्या जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजनेतून लाभपट्ट्यात हक्काचे पाणी सोडून कायमस्वरूपी नियोजित आवर्तन द्यावेत, अशी मागणी शेतकºयांची आहे.
जनाई-शिरसाई पाणीप्रश्न पेटला, उंडवडीत शेतकरी आंदोलनाची तीव्रता वाढली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2019 1:06 AM