रतन बिनावत (वय ६५, रा.महंमदवाडी हडपसर), नंदू आत्राम रजपूत (वय ५५, रा.इंद्रप्रस्थ बंगला वारजे जकात नाका जवळ), संपत पन्नालाल बिनावत (वय ५६, रा सत्व नगर महंमदवाडी हडपसर), मुन्ना रमेश कचरावत (वय ५७,रा. वारजे माळवाडी), आनंद रामचंद्र बिनावत (वय ५०, रा सत्व नगर महंमदवाडी हडपसर), देवानंद राजू कुंभार (वय ५१, रा धनकवडी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
जागेचा वाद जात पंचायतीत सोडवण्यास नकार दिल्याने भातू समाजाच्या महिलेला आणि तीच्या कुटुंबीयांना पुरंदर मधील गराडे गावाजवळील मंगल कार्यालयात समाजाची बैठक घेत जात पंचायतीच्या ६ पदाधिकाऱ्यांनी एका वर्षासाठी बहिष्कृत केले होते. या विरोधात या महिलेने पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करत वरिल आरोपींना पोलिसांनी सातारा जिल्ह्यातील वाठार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोळशी येथील एका फार्महाउस वरून रविवारी रात्री एक वाजता अटक केली, अशी माहिती सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस अधीक्षकअण्णासाहेब घोलप यांनी दिली आहे. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असतात न्यायालयाने त्यांना ८ डिसेंबर पर्यंत कोठडी दिली आहे.