प्रसाद खुशाल तुपे व हृषीकेश खुशाल तुपे (दोघे रा. उरुळी कांचन, अमृतनगर, ता. हवेली) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहेे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुदांंडे यांची मुलगी श्रद्धा (वय २०) हीचे लग्न ९ नोव्हेंबर २०२० रोजी प्रसाद तुपे याचे सोबत झाले. परंतु तो नीट सांभाळ करत नाही म्हणून गेल्या दोन महिन्यांपासून ती माहेरी राहण्यास आली होती. त्यानंतर ३ जानेवारी रोजी रात्री साडेआठच्या सुमारास श्रध्दाचे वडील भाऊसाहेब कुदांडे व आई नीता प्रसादच्या घरी गेले. लग्नात श्रध्दाला घातलेले सोन्याचे गंठण व कानातले दागिने परत करत त्यांनी त्यांनी लग्नात दिलेल्या गृहपयोगी वस्तु परत मागितल्या. त्यामुळे त्याने रागाने प्रसाद यानेे रागाला येऊन शिवीगाळ केली व घरातील बांबूच्या काठीने माराहण केली. त्यावेळी प्रसादचा भाऊ हृषीकेश यानेही लाथाबुक्यांनी मारहाण केली व उरुळी कांचनमध्ये कसे राहता हे मी पाहतो, अशी धमकी दिली.
मुलीची बाजू असल्याने कुदांडे यांनी तक्रार दिली नव्हती. परंतु घरातील नातेवाईकांशी चर्चा करून व पूर्ण विचार करून शुक्रवारी (६ जानेवारी) तक्रार दिली. पुुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पवन चौधरी हे करत आहेत.