ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 30 - देशातील विविध राष्ट्रीय संशोधन संस्थानकडे पाहिले तर तिथे शासकीय क्षेत्रातील अधिकारशाही, लालफित, आत्मसंतुष्ट वृत्ती आणि निष्क्रियता दिसून येतात अशी टिका ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांनी केली.
विद्येसाठी सतत झटणे, विद्यादान करण्यात आंनद मानणे, उत्कृष्टतेची कदर करणे आणि धन-सन्मानांबद्दल निस्पृह असणे हे गुण आजच्या किती विद्वानांत दिसून येतात असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या १११ व्या पदवीप्रदान समारंभात ते बोलत होते. यावेळी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र. कुलसचिव अरविंद शाळीग्राम, परीक्षा मंडळाचे संचालक अशोक चव्हाण उपस्थित होते.