Jayant Patil ( Marathi News ) : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर माजी पोलीस अधिकारी परमबीर सिंह यांनी काही दिवसापूर्वी गंभीर आरोप केले. यामुळे राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. तसेच परमबीर सिंह यांनी 'राष्ट्रवादी शरदचंद्र पवार' पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावरही आरोप केले होते. 'जयंत पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील राजकीय विरोधकांवर गुन्हे दाखल करण्यासाठी दबाव आणला होता, असा गंभीर आरोप केला. दरम्यान, आता जयंत पाटील यांनी या आरोपला प्रत्युत्तर दिले. 'राष्ट्रवादी शरदचंद्र पवार' पक्षाची शिवस्वराज्य यात्रा सुरू आहे. आज ही यात्रा हडपसर येथे आली आहे. यावेळी जयंत पाटील यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला.
बच्चू कडूंसोबत सविस्तर चर्चा, संजय काकडेही भेटले; शरद पवार महायुतीला धक्का देण्याच्या तयारीत?
माजी पोलीस अधिकारी परमबीर सिंह यांच्या आरोपावर बोलताना जयंत पाटील म्हणाले, मी कधीच असं कुणालाही सांगितलं नाही. ते काय बोलत आहेत, या विषयी मला जरा देखील माहिती नाही. मी देवेंद्र फडणवीस आणि गिरीज महाजन यांच्याबद्दल सांगायला मी तेव्हा गृहमंत्री होतो का? मी त्यांना असं का सांगू, असा सवालही जयंत पाटील यांनी केला.
"पक्ष कधीच कोणाला असं सांगत नाही. आमचे मंत्रिमंडळ जाऊन किती वर्षे झाली? आरोप होऊन किती वर्ष झाली, ३ वर्षानंतर काही गोष्टी सांगत असतील तर त्याकडे किती लक्ष द्यायचं, फक्त परमवीर सिंह यांची चौकशी सुरू आहे ती व्यवस्थित व्हावी हीच अपेक्षा, असंही जयंत पाटील म्हणाले.
'मनोज जरंगे हे स्वतंत्र विचारांनी काम करतात'
आज मनसे प्रमुख राज ठाकरे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी जरांगेंच्या आडून राजकारण सुरू असल्याचा आरोप केला. यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले, मनोज जरांगे हे स्वतंत्र विचारांनी काम करतात. ते कुणाचं ऐकत नाहीत. सल्ला मानून काम करत नाहीत, मला वाटत यात काही तथ्य नाही. राज ठाकरे रागात येऊन काही बोलत असतील यापेक्षा जास्त गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असं प्रत्युत्तर जयंत पाटील यांनी दिले.
सरकारने कधीच प्रकल्प थांबवले नाहीत
महाराष्ट्रातून आणखी एक प्रकल्प गुजरातला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. महिंद्र कंपनीचा चीनच्या कंपनीसोबत २५ हजार कोटींचा करार झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यावर बोलताना जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. " गुजरातला काही जात असेल तर आमचे मुख्यमंत्री आणि आमचे सरकार तो प्रकल्प अडवू शकणार नाही, आमचे अनेक प्रकल्प तिकडे गेले आहेत, आमच्या सरकारने कधीच थांबवलं नाही, असा टोलाही पाटील यांनी लगावला.