शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
3
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
4
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
5
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
6
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
7
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
8
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
9
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
10
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
11
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
12
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
13
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
14
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
15
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
17
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
18
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
19
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
20
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!

आमच्या नेत्यांना बदनाम केलं जातंय, अजित पवारांनी कधीच कागदपत्रे दडवली नाहीत- जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2021 2:23 PM

इन्कम टॅक्स विभागाला माहिती हवी होती तर त्यांनी कारखान्यांना विचारायला हवं होतं. पण धाड घालायची, पहाटेच घालायची ही सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत असल्याचेही जंयत पाटील यांनी सांगितले.

ठळक मुद्देलखीमपूर दुर्घटनेला भाजप जबाबदार असल्याचा आरोपही मंत्री पाटील यांनी केलालखीमपूरचं हत्याकांड जालियनवाला बाग सारखेच असल्याचे मंत्री पाटील म्हणाले

पुणे: आज पुण्यात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते दगडूशेठ गणपतीची आरती झाली. 'मंदिर उघडण्यात आले आहेत, हा सरकारचा निर्णय स्वागतार्ह आहे. पुन्हा कोरोनाची लागण होऊ नये, महाराष्ट्र सुरक्षित रहावा हीच गणपती चरणी प्रार्थना केल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.

पुढे बोलताना मंत्री पाटील म्हाणाले, राज्यात आमच्या नेत्यांना बदनाम करण्याचं षढयंत्र भाजप करतंय करत आहे. भाजपचे पुढारी आमच्या नेत्यांची नावं घेतात आणि त्या पाठोपाठ ईडी, सीबीआय, इन्कमटॅक्स येते. भाजपनं राष्ट्रवादीचा एवढा धसका का घेतलाय..?, असा प्रश्नही जयंत पाटील यांनी केला. आमचा कायद्यावर विश्वास आहे. यापूर्वी छगन भुजबळ यांना असाच त्रास देण्यात आला, यांनाही न्याय मिळाला असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.

'आमचे राष्ट्रवादीचे नेते निर्दोष आहेत, त्यांना बदनाम केलं जातंय. धाडसत्र चालवण्याचा या व्यवस्थेचा हेतू आहे. या देशातल्या सर्व एजन्सी भाजप चालवतंय, सरकार चालवत नाही! इन्कम टॅक्स विभागाला माहिती हवी होती तर त्यांनी कारखान्यांना विचारायला हवं होतं. पण धाड घालायची, पहाटेच घालायची ही सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत असल्याचेही जंयत पाटील यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कधीच कशाचीच कागदपत्रे दडवली नाहीत, ही माहितीही जयंत पाटील यांनी दिली. तसेच लखीमपूर दुर्घटनेला भाजप जबाबदार असल्याचा आरोपही मंत्री पाटील यांनी केला. सध्या देशातील शेतकरी पेटून उठला आहे. लखीमपूरचं हत्याकांड जालियनवाला बाग सारखेच असल्याचे मंत्री पाटील म्हणाले. 

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलAjit Pawarअजित पवारLakhimpur Kheri Violenceलखीमपूर खीरी हिंसाचारBJPभाजपा