मुंबई/पुणे : सीबीएसईकडून इंजिनीअरिंग कॉलेजांमधील प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या जेईई (जॉइंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन) मेन्स परीक्षेचा निकाल सोमवारी सायंकाळी जाहीर झाला. यंदा पहिल्यांदाच जेईईचा कटआॅफ खूप घसरल्याचे दिसून येत आहे.या परीक्षेत आंध्र प्रदेशच्या विजयवाड्याचा सुरज कृष्णा भोगी देशात पहिला आला आहे. पुण्याचा शरद भट देशात ३१ वा तर अर्णव दातार ४१ वा आला. जेईई मेन्सची भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित विषयांची ३६० गुणांची परीक्षा ८ एप्रिलला झाली होती. तर, आॅनलाइन परीक्षा १५ आणि १६ एप्रिल रोजी झाली होती. २४ एप्रिल रोजी याची आन्सर की जाहीर करण्यात आली होती.यासाठी कटआॅफ सर्वसाधारण गटासाठी ७४ तर इतर मागासवर्ग प्रवर्गासाठी (ओबीसी) ४५, अनुसूचित जाती (एससी) २९ आणि अनुसूचित जमातींकरिता (एसटी) २४ असा घसरला आहे. जेईई मेन्सचे तिन्ही पेपर खूपच अवघड होते, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे होते.जेईई मेन्स परीक्षेसाठी देशभरातून १० लाख ४६ हजार विद्यार्थी बसले होते, यानुसार जेईई-अॅडव्हान्सकरिता दोन लाख ३१ हजार २४ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. पुण्यातील शरद भट, अर्णव दातार, अनुज श्रीवास्तव (६६), चिन्मय भारती (१९७) यांनी रँक प्राप्त केली.महाराष्टÑातून दीड लाख विद्यार्थ्यांनी जेईई मेन्सची परीक्षा दिली होती, त्यापैकी ३० हजार विद्यार्थी पुण्यातील होते. त्यापैकी १ हजार विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. ज्या उमेदवारांनी आॅनलाइन, तसेच आॅफलाइन परीक्षा दिली होती, ते आपला निकाल अधिकृत वेबसाइट ६६६.ूु२ी१ी२४’३२.ल्ल्रू.्रल्ल वर पाहू शकणार आहेत. यातील एकूण २,३१,०२४ विद्यार्थी जेईई-अॅडव्हान्स या दुसऱ्या टप्प्यासाठी पात्र ठरले आहेत.
जेईई निकालाचा कट आॅफ घसरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2018 6:21 AM