याप्रसंगी उपअधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते, मेडिकल अधीक्षक डॉ. तावरे, कोविड इनचार्ज डॉ. प्रो. हरिष टाटिया तसेच ट्रस्टचे विश्वस्त सुचेता शहा, मनोज गांधी, चकोर गांधी व सुरेंद्र गांधी उपस्थित होते.
तसेच कोविड योद्धे म्हणजेच पोलीस दल यांच्या सुरक्षिततेसाठी यांना मदतीचा व माणुसकीचा हात देण्यासाठी ट्रस्टने पुढाकार घेऊन चतु:श्रृंगी पोलीस स्टेशन हद्दीमधील १६० पोलीस योध्दयांना मास्क, १६० फेसशिल्ड, १६० सॅनिटायझर बॉटल्स असे साहित्य परिमंडळ-४ चे पोलीस उपायुक्त पंकजजी देशमुख व उपअधीक्षक खडकी विभागाचे रमेश गलांडे यांच्या हस्ते देण्यात आले. याप्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे व जीवप्रभा चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते. जीवप्रभा चॅरिटेबल या ट्रस्टमार्फत मुलींचे वसतिगृह चालवण्यात येते. या ट्रस्टतर्फे समाजातील गरजूंना शैक्षणिक शिष्यवृत्ती, वैद्यकीय आर्थिक मदत, अनाथ आश्रमातील मुलांना कपडे, शैक्षणिक साहित्य व युनिफॉर्म स्वरूपात मदत देण्यात येते.