पुणे : पार्किंग पॉलिसीअंतर्गत वाहनतळासाठी सूचवलेले दर म्हणजे महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टी पुणेकरांवर लादत असलेला जिझिया करच आहे, अशी टीका शिवसेनेने केली आहे. या जाचक कराला तीव्र विरोध असून, त्यासाठी आंदोलन करण्यापूर्वीच तो मागे घ्यावा, अशी मागणीही केली.प्रशासनाचे अपयश झाकण्यासाठी केलेला हा प्रकार आहे व सत्ताधारी भाजपाचे पदाधिकारी त्याला बळी पडत आहे, असे शिवसेनेचे नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांनी सांगितले. गेल्या अनेक वर्षांपासून नगरसेवक म्हणून वाहनतळासाठी सुविधा कराव्यात, अशी मागणी प्रशासनाकडे करीत आहोत. त्यासाठी उपायही सूचवले, मात्र प्रशासनाने काहीच केले नाही व आता वाहनांची संख्या वाढली म्हणून ओरड करून वाहनतळासाठी पैसे वाढवले जात आहेत. शहरात अनेक भूखंड वाहनतळ म्हणून राखीव ठेवले आहेत. महापालिकेने ते ताब्यात घेण्याची गरज आहे; मात्र ते केले जात नाही. त्याशिवाय शहराबाहेर जाणाऱ्या नाल्यांवर स्लॅब टाकून तिथे वाहनतळ करता येणे शक्य आहे, तसे सूचवण्यात आले होते, पण त्याकडेही प्रशासनाने कधी लक्ष दिले नाही.
पे अॅण्ड पार्क भाजपाचा पुणेकरांवरील जिझिया करच; निर्णय मागे घेण्याची शिवसेनेची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 1:17 PM
पार्किंग पॉलिसीअंतर्गत वाहनतळासाठी सूचवलेले दर म्हणजे महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टी पुणेकरांवर लादत असलेला जिझिया करच आहे, अशी टीका शिवसेनेने केली आहे.
ठळक मुद्देप्रशासनाचे अपयश झाकण्यासाठी केलेला हा प्रकार : पृथ्वीराज सुतार'शहराबाहेर जाणाऱ्या नाल्यांवर स्लॅब टाकून तिथे वाहनतळ करता येणे शक्य'