जेजुरी: जेजुरीत सहाव्या दिवशी जेजुरी देवसंस्थान च्या विश्वस्त पदी बाहेरील व्यक्तींची धर्मादाय आयुक्त कार्यालयाने नियुक्ती करून स्थानिक व्यक्तींना संधी न दिल्याने जेजुरीत ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाच्या सहाव्या दिवशी जेजुरीकर नागरिक व महाराष्ट्र राज्य व्यसन मुक्त युवक संघाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. दिनांक ४ जून रोजी मनसे चे अध्यक्ष राज ठाकरे यांना ग्रामस्थ व आंदोलक यांचे शिष्ट मंडळ भेट घेणार असल्याचे माजी विश्वस्त संदीप जगताप यांनी सांगितले
सकाळी युवकांनी जेजुरी शहरातून फेरी काढून जेजुरी गडावरील राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. जो पर्यंत जेजुरीतील स्थानिक व्यक्तींची विश्वस्त पदावर निवड होत नाही तो पर्यंत आंदोलन तीव्र करण्यात येईल, नवनियुक्त बाहेरील विश्वस्त यांना काम करू दिले जाणार नाही असा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रवक्त्या सक्षना सलगर यांनी ही आंदोलकांची भेट घेऊन आपण तुमच्या आंदोलनात सहभागी असून पूर्ण पाठींबा व्यक्त व्यक्त केला आहे.
दिनांक ४ जून रोजी मनसे चे अध्यक्ष राज ठाकरे यांना ग्रामस्थ व आंदोलक यांचे शिष्ट मंडळ भेट घेणार असल्याचे माजी विश्वस्त संदीप जगताप यांनी सांगितले.या आंदोलनात जेजुरी ग्रामस्थ,पालखी सोहळा ट्रस्ट,तसेच पुरंदर तालुका व्यसन मुक्त संघाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.