गेल्या १३ महिन्यांत खंडेरायाच्या चार सोमवती उत्सव पार पडले. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गडकोट ते कऱ्हा नदीतीरावर जाणारे चारही पालखी सोहळे रद्द करण्यात येऊन मोजक्या मानकरी ,सेवेकरी, पुजारी व पोलीस प्रशासनाच्या वतीने उत्सव मूर्ती चारचाकी वाहनातून कऱ्हा नदीवर नेत दही-दुधाचा अभिषेक करीत मूर्तींना स्नान घालण्यात आले होते.
या वेळीही सोमवार (दि.१२) सकाळी ८:३० पर्यंत अमावस्या काळ असल्याने पोलीस प्रशासनाच्या सूचनेनुसार मोजक्या सेवेकरी, पुजारी ,मानकरी यांनी भल्या पहाटे ३ वाजता उत्सवमूर्ती वाहनातून नेत कऱ्हा नदीतीरावरील पापनाश तीर्थावर विधिवत अभिषेक करत स्नान घालण्यात आले.
व त्यानंतर पुन्हा पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास उत्सवमूर्ती गडावर आणण्यात आल्या.
कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या सूचना ,नियम ,अटींचे पालन करीत सर्व धार्मिक विधी करण्यात आले असले, तरी ३० तारखेपर्यंत भाविकभक्तांना गडावर देवदर्शन बंद करण्यात आले आहे.
सोमवती अमावस्येनिमित्त पुणे येथील भाविक पाचुंदकर यांच्याकडून देवांचा गाभारा व मुख्य मंदिर फुलांनी सजविण्यात आले होते. देवसंस्थानच्या वतीने गडाला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
गेली वर्षभरात भाविकांना जत्रा-यात्रा उत्सवात सामील न होता आल्याने येळकोट येळकोट जयमल्हार, सदानंदाचा येळकोट या गजराशिवाय व भंडारा-खोबरे यांच्या उधळणीशिवाय खंडेरायाचे उत्सव साजरे होत आहेत. शहरातील दुकाने सुद्धा बंद आहेत .
सोमवती उत्सवानिमित्त फुलांनी सजविण्यात आलेला खंडेरायाचा गाभारा ,,,,,,