शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्राच्या नूतनीकरण कामाचा शुभारंभ पालिकेच्या नगराध्यक्षा वीणा सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन पाणीसाठा वाढवणे आवश्यक होता. त्याचबरोबर पाणी जलशुद्धीकरण यंत्रणा खूप जुनी झाली असल्याने पालिकेने केंद्राच्या नूतनीकरणाचे काम हाती घेतले आहे. यामध्ये केंद्राचे तीन टप्प्यात काम पूर्ण केले जाणार आहे. जलशुद्धीकरणाचे दोन्ही नवीन पंप आणि पॅनल बसवण्यात येणार आहेत. यासाठी ७१ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात जलशुद्धीकरण केंद्राचे सर्व व्हॉल्व्ह व नवीन जलशुद्धीकरनाची क्लोरीनेशन सिस्टीम ६७ लक्ष रुपये खर्चून नव्याने उभारण्यात येणार आहे.
केंद्राची व्ही वायर अंडर ड्रेन सिस्टीम ही केली जाणार असून त्यासाठी ७४ लाख रुपयांची तरतूद आहे याशिवाय संपूर्ण जलशुद्धीकरण केंद्रास संरक्षक भिंत आणि पेव्हिन ब्लॉक ही बसवण्यात येणार आहेत. त्यासाठी ही ६६ लक्ष रुपये खर्च येणार आहे. संपूर्ण जलशुद्धीकरण केंद्राच्या नूतनीकरणासाठी पावणे तीन कोटी रुपये खर्च केले जाणार असून पुढील तीन महिन्यांत ही सर्व कामे पूर्ण केली जाणार आहेत. सद्याची केंद्राची दररोज तीस लाख लिटर पाणी शुद्धीकरणाची क्षमता वाढून ती दररोज पंचावन्न लाख लिटर होणार आहे. असे ही सोनवणे यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाला मुख्याधिकारी पूनम कदम, नगरसेवक सचिन सोनवणे, महेश दरेकर, अजिंक्य जगताप, नगरसेविका पूर्णिमा राऊत, रुख्मिनी जगताप, पाणी पुरवठा अभियंता प्रसाद जगताप, माजी नगरसेवक हेमंत सोनवणे, सुरेश दोडके, अलीम बागवान, राहुल दोडके आदी उपास्थित होते.
--
०१ जेजुरी जुलशुध्दीकरण
फोटो ओळी: जेजुरी जलशुद्धीकरण केंद्राच्या नूतनीकरण शुभारंभ प्रसंगी उपस्थित नगराध्यक्षा वीणा सोनवणे