शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
2
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
3
"महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
4
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
5
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
6
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
7
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
8
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
10
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
11
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
12
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
13
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
14
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
15
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
16
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
17
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
18
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
19
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
20
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण

‘येळकोट येळकोट’च्या गजरात जेजुरीगड दुमदुमला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 11:36 PM

माघ पौर्णिमा उत्साहात : खंडेरायाच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी

जेजुरी : एकीकडे ‘येळकोट येळकोट जय मल्हार’चा आसमंत दुमदुमून टाकणारा गजर त्याच वेळी कोळीनृत्य व कोळीगीतांच्या तालावर भंडारा अन् खोबऱ्याची मुक्तहस्ताने उधळण अशा उत्साही वातावरणात आज माघ पौर्णिमेनिमित्त भरलेल्या यात्रेला सुरुवात झाली.

तीर्थक्षेत्र जेजुरीत माघ पौर्णिमेनिमित्त लाखावर भाविकांनी कुलदैवताचे दर्शन घेतले. तर कोकणातील कोळी बांधवांनी आज सायंकाळी आपआपल्या पालख्यांसह वाजतगाजत पारंपरिक नृत्य करीत गडावर जाऊन कुलदैवताची देव भेट उरकली. माघ पौर्णिमेनिमित्त राज्यभरातील भाविक प्रासादिक शिखर काठ्यांसह जेजुरीला येऊन देवदर्शन घेत असतात. दर चार वर्षांनी कोकणातील मुंबई, अलिबाग, धारावी, वर्सोवा, रेवस, बोरणी, वेसाव, रायगड आदी परिसरातील कोळी बांधव पालख्या घेऊन जेजुरीस येतात. या वर्षी कोकणी बांधवांच्या ४० हून अधिक पालख्या देवभेटीसाठी जेजुरीत दाखल झाल्या आहेत. जेजुरीत कोळी बांधवासह शिखरी काठ्यांच्या समवेत आलेल्या भाविकांची जेजुरीत कालपासून मोठी गर्दी झालेली असून, राज्यभरातून भाविक आलेले आहेत.सायंकाळी ५ च्या सुमारास कोळी बांधवांच्या पालख्यांनी जेजूरी गडावर जावून देवभेट घेतली, यावेळी ऐतिहासिक चिंचबाग ते खंडोबा गडापर्यंत भाविकांनी पालख्यांची मिरवणूक काढली होती.आज रंगणार देवभेटीचा सोहळा४बुधवारी शिखरी काठ्यांच्या देवभेटीचा सोहळा रंगणार आहे. हा सोहळा नेहमीच वादग्रस्त राहिल्याने पोलिसांनीच सोहळ्यातील मानकरी संगमनेरकर होलम आणि सुपेकर खैरे यांना एकत्र बसवून वर्षाआड देवभेटीचा प्रथम मान देण्याचा तोडगा काढला. त्यामुळे यंदा सकाळी ९ ते ११ या वेळेत संगमनेरकर होलमांची मानाची शिखरकाठी सोबतच्या प्रासादिक शिखरकाठ्यासह गडावर जाऊन देवभेट घेणार आहे. दुपारी २ ते ५ या वेळेत सुपेकर खैरे यांची मानाची शिखरकाठी देवभेटीला जाणार आहे. त्यांच्यासोबत स्थानिक होळकरांची शिखरकाठी ही देवभेट घेणार आहे.

टॅग्स :JejuriजेजुरीPuneपुणे