शनिवारी दि.१२ डिसेंबर ते सोमवार दि. १४ डिसेंबरपर्यंत जेजुरीत भाविकांना प्रवेश बंद राहणार आहे. त्यामुळे राज्याच्या विविध भागातील भाविक भक्तांनी देवदर्शनासाठी जेजुरीत येऊ नये, प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी केले आहे.
येत्या सोमवारी (दि.१४) सोमवती अमावस्या असल्याने या पार्श्वभूमीवर पेशवे लॉज येथे ग्रामस्थ खांदेकरी, मानकरी, पुजारी, सेवेकरी, देवसंस्थान विश्वस्त मंडळ, नगरपालिका प्रशासन यांची संयुक्तिक बैठक घेण्यात आली. बैठकीत येत्या सोमवारी येणाऱ्या भर सोमवती अमावस्या यात्रा आणि मंगळवार पासून सुरू होणारा सहा दिवसांचा चंपाषष्टी उत्सवासंदर्भात चर्चा झाली. चर्चेत सोमवती यात्रा रद्द करण्याचा तर चंपाषष्टी षढरास्त्रोत्सव ही साधेपणात साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी प्रमुख वतनदार इनामदार राजेंद्र पेशवे, सचिन पेशवे, ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष गणेश आगलावे, सचिव छबन कुदळे, उपाध्यक्ष आबा राऊत, विरोधी पक्षनेते जयदीप बारभाई, माजी नगरसेवक हेमंत सोनवणे, माजी प्रमुख विश्वस्त सुधीर गोडसे, विश्वस्त शिवराज झगडे, संदीप जगताप, पंकज निकुडे, रोहिदास माळवदकर, रामचंद्र माळवदकर, पंडित हरपळे, माणिक पवार, अरुण खोमणे, संजय खोमणेपाटील, बारा बलुतेदार संघाचे अध्यक्ष संतोष खोमणे, ग्रामस्थ कृष्णा कुदळे ,जालिंदर खोमणे ,दिलीप मोरे, रवींद्र बारभाई,रमेश बयास, अनिल बारभाई, दिलीप आगलावे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक विश्वस्त संदीप जगताप यांनी केले. तर आभार छबन कुदळे यांनी मानले.
चौकट
प्रशासनाच्या आदेश, सूचनांचे पालन करण्यात येईल. रूढी, परंपरेनुसार श्रींचे सर्व धार्मिक विधी करण्यात येतील. मात्र, पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे. भाविकांनी प्रशासनाच्या आदेशानुसार १२ ते १४ डिसेंबरच्या काळात जेजुरीत येणे टाळावे, असे आवाहन इनामदार पेशवे यांनी केले आहे.
फोटो मेल केला आहे.
जेजुरी येथे सोमवती यात्रा बैठकीत मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक सुनील महाडिक ,