याप्रकरणी मनोज सुदाम कुंभार (वय ४०, रा. पवार मळा, वडकी, घर क्रमांक १५८८, दत्त मंदिराजवळ ता. हवेली) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवार (६ जुलै) रोजी संध्याकाळी ५-३० वाजण्याच्या सुमारास कुंभार हे कांबळेश्वर (ता. बारामती) येथे रहाते घरास कुलूप लावून गेले होते. त्यानंतर ते गुरुवार (८ जुलै) रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घरी परतले. त्यावेळी त्यांना टेरेसचा दरवाजा कोणीतरी आत येऊन उघडलेचे निदर्शनास आले. त्यांनी घरात जाऊन पाहिले असता, बेडरूममधील कपाटाचे लॉक तुटलेले व सर्वसामान रूममध्ये अस्ताव्यस्त पडलेले दिसले. त्यांनी कपाटात ठेवलेले सोन्याचे व चांदीचे दागिने पाहिले असता, ३६ हजार रुपये किमतीच्या १८ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्यांच्या चैन, ३६ हजार रुपये किमतीचे १८ ग्रॅम वजनाचे एक सोन्याचे मंगळसूत्र, १० हजार रुपये किमतीचे ५ ग्रॅम वजनाची दोन सोन्याची साधी डिझाईन असलेली मंगळसूत्र, १४ हजार रुपये किमतीच्या ७ ग्रॅम वजनाचे दोन कानात घालवण्याच्या सोन्याच्या टॉप्स जोड्या, ६ हजार रुपये किमतीच्या ३ ग्रॅम वजनाच्या दोन कानात घालावयाचे सोन्याचे रिंगा याचबरोबर ४ हजार रुपये किमतीच्या १२ भार वजणाच्या चांदीच्या तीन फॅन्सी पायल जोड्या असे एकूण ४८ ग्रॅम सोन्याचे व १२ भार चांदीचे १ लाख ६ हजार रुपये किमतीचे दागिने आढळून आले नाहीत. त्यामुळे त्यांनी अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दिली आहे.
वडकी येथे १ लाख रुपये किमतीचे दागिने चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 4:08 AM