शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे सरकारचे मोठे निर्णय; मुंबईत कारला टोलमुक्त प्रवेश अन्...; मध्यमवर्गीयांसह अनेकांना दिलासा, अंमलबजावणी सुरू
2
भाजपाची ५० उमेदवारांची पहिली यादी तयार; महायुतीत ५८ जागांवर चर्चा अद्याप बाकी
3
अखिलेश यादव महाराष्ट्रात, राष्ट्रवादी-ओवेसींच्या गडांना फटका बसणार; सपाचा हा आहे प्लॅन...
4
काँग्रेसच्या आमदाराने अजित पवारांच्या राष्ट्रवादीत केला प्रवेश, शिंदेंच्या शिवसेनेचं टेन्शन वाढलं!
5
आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभाचे योग, यश-कीर्ती; चांगल्या बातम्या मिळतील, शुभ दिवस
6
"...ज्यावरून मी त्याला कायम चिडवायचो"; अतुल परचुरेंच्या निधनाने राज ठाकरे झाले भावूक
7
भारताची कॅनडाविरोधात मोठी कारवाई! 6 उच्चायुक्तांची हकालपट्टी, 5 दिवसांत सोडावा लागणार देश
8
Mumbai Video: बापाने हात जोडले, मुलाला वाचण्यासाठी आई अंगावर पडली; पण ते मरेपर्यंत मारत राहिले
9
Atul Parchure Passed Away: 'वल्ली' अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरे यांचं निधन, काही वर्षांपूर्वीच कर्करोगावर केलेली मात
10
मोठी बातमी: राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी सरकारकडून ७ नावांवर शिक्कामोर्तब; कोणाकोणाला मिळाली संधी?
11
नववीपासूनची मैत्री...अतुल परचुरेंच्या निधनानंतर जयवंत वाडकर भावूक; शेअर केला शेवटचा फोटो
12
चतुरस्त्र अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरेंच्या निधनानंतर CM एकनाथ शिंदेंसह राजकीय विश्वातून आदरांजली
13
"....तोपर्यंत हे म्हातारं काही थांबत नाही"; शरद पवारांचा निर्धार काय?
14
Pune Crime: पुण्यात तरुणीवर अत्याचार करणाऱ्या दुसऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; यूपीतून अटक!
15
कृष्णा महाराज शास्त्री भगवानगडाचे उत्तराधिकारी होणार; कधी बसणार गादीवर? जाणून घ्या...
16
उद्धव ठाकरेंवर अँजिऑप्लास्टी नाही, केवळ नियमित तपासणी; आदित्य ठाकरेंची माहिती
17
हरयाणा निकालातून घेतला धडा; महाराष्ट्रातील नेत्यांना काँग्रेस हायकमांडचे ३ आदेश
18
'४८ पैकी ३१ जागा जिंकल्यावर यांना लाडकी बहीण आठवली'; शरद पवारांचा महायुती सरकारला खोचक टोला
19
ठाकरेंना धक्का, टोपेंचं वाढलं टेन्शनl; 'शिवबंधन' तोंडत हिकमत उढाण शिंदेंच्या शिवसेनेत!
20
Acidity ने हैराण झालायत? वारंवार पोटात जळजळतं? 'हे' ५ उपाय करा, नक्की वाटेल 'रिलॅक्स'!

मंडईतील शारदा-गणेश मंदिरात दागिन्यांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2015 3:26 AM

अखिल मंडई मंडळाच्या शारदा-गणेश मंदिरामधील महिरपीची काच फोडून चोरट्याने ४३ लाख ४८ हजार ७२३ रुपयांचे दागिने लंपास केले.

पुणे : अखिल मंडई मंडळाच्या शारदा-गणेश मंदिरामधील महिरपीची काच फोडून चोरट्याने ४३ लाख ४८ हजार ७२३ रुपयांचे दागिने लंपास केले. ही घटना बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास घडली. विश्रामबाग पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, चोरट्याची प्रत्येक कृती मंदिरामधील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. मंडई परिसरात अखिल मंडई मंडळाचे शारदा-गणेश मंदिर आहे. दोन वर्षांपूर्वी त्याचे नूतनीकरण झाले आहे. या मंदिरातील शारदा-गणेशाची मूर्ती शंभर वर्षे जुनी आहे. कार्यकर्त्यांनी मंगळवारी रात्री मंदिर बंद केले होते. बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास दाढी वाढलेला, अंगाने सडपातळ असलेला हा चोरटा मंदिराजवळ आला. सभामंडपाच्या जवळच्या चिंचोळ्या बोळामध्ये बराच वेळ तो येरझाऱ्या घालत होता. मंदिराच्या महिरपीला असलेली काच विटा मारून फोडून तो आत घुसला. मूर्तीवरील हार, मंगळसूत्र, साखळी, पूजासाहित्य आणि मोहनमाळ असा ऐवज त्याने खिशात भरला. बराच वेळ मूर्तीसमोर घुटमळणाऱ्या या चोरट्याने चोरी करताना गजाननाच्या मूर्तीला हात जोडून नमस्कार केल्याचेही सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. 

मंदिराचे पुजारी श्रीपाद कुलकर्णी बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास नेहमीप्रमाणो मंदिरात आले असता महिरपीची काच फुटल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने जवळच असलेल्या मंडई पोलीस चौकीमध्ये धाव घेतली. मुर्तीवरील आभुषणो आणि पुजा साहित्य चोरीला गेल्याचे समजताच पोलिसांसह मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, संजय मते, अॅड. मंदार जोशी, भोला वांजळे, मोहन ढमढेरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शहरातील विविध गणोशोत्सव मंडळांचे अध्यक्ष आणि पदाधिका-यांनी मंडई मंडळाकडे धाव घेतली. 
घटनास्थळाला उपायुक्त मकरंद रानडे, पोलीस उपायुक्त तुषार दोषी, सहायक आयुक्त अनिल पाटील, वरिष्ठ निरीक्षक हेमंत भट, गुन्हे शाखेचे निरीक्षक रघुनाथ फुगे यादींनी भेट दिली. 

चोरट्याने रेकी केल्याचे स्पष्टमंदिराच्या भोवती बराच वेळ घुटमळत चोरट्याने आसपास कोणी नाही, याची खात्री केली. मंदिरालगच्या चिंचोळ्या बोळामधून तो सभामंडपापर्यंत गेला. त्याने तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची दिशा बदलली. त्यानंतर महिरपीच्या काचेवर दगड मारून आत प्रवेश केला. चोरट्याने मंदिरामधील मूर्तीवरील दागिने चोरून नेल्याचा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. पोलिसांनी तातडीने तपास करून गुन्हा उघडकीस आणावा, तसेच चोरट्याला गजाआड करावे. आम्ही पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून दिले असून तपासात पूर्ण सहकार्य करीत आहोत.-अण्णा थोरात, अध्यक्ष, आखिल मंडई मंडळ