श्रीक्षेत्र तुळापूर (ता.हवेली) येथे छ. संभाजी महाराज माध्यमिक विद्यालय येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती समारंभात वागस्कर बोलत होते. अध्यक्षस्थानी उपसरपंच संतोष शिवले होते. यावेळी मुख्यध्यापक आबासाहेब जाधव, माजी सरपंच अशोक वागस्कर, योगेश बानुके, आदेश शिवले शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
वागस्कर पुढे म्हणाले की, एक माता काय करू शकते, आदर्श माता कशी असते याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे राष्ट्रमाता जिजाबाई होय तर उठा जागे व्हा.. ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका.. असा मंत्र स्वामी विवेकानंद यांनी दिला, त्यागात जीवन आहे, सेवेत आनंद आहे हे या थोर माणसांनी शिकवले. जीवनात शिक्षण आणि चारित्र्याला महत्त्व द्या.
या वेळी सिद्देश शिवले, गीता शिवले या विद्यार्थ्यांची भाषणे झाली.
सूत्रसंचलन अशोक शेकडे तर आभार सुरेखा सालके यांनी मानले.
१४ लोणीकंद
सुनील वागस्कर यांचा स्वामी विवेकानंद यांची प्रतिमा देऊन सत्कार केला.