शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
2
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
3
"एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना माहीत आहे की..."; महायुतीच्या CM पदाच्या चेहऱ्यावरून ओवेसींचं मोठं विधान
4
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
5
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
6
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
7
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
8
उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
9
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
11
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
12
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेशाद्रीने सांगितली आठवण
13
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
14
Maharashtra Election 2024 Live Updates: ‘आम्ही हे करू’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरे म्हणाले...
15
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
16
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
17
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
18
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
19
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
20
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!

जेजुरीत चंद्रग्रहणामुळे भाविकांची गर्दी कमी

By admin | Published: April 04, 2015 11:09 PM

तीर्थक्षेत्र जेजुरीत आज चैत्र पौर्णिमेनिमित्त राज्यभरातून आलेल्या भाविकांनी गर्दी केली होती. कालपासून दिवसभरात लाखावर भाविकांनी कुलदैवत खंडोबाचे दर्शन घेतले.

जेजुरी : तीर्थक्षेत्र जेजुरीत आज चैत्र पौर्णिमेनिमित्त राज्यभरातून आलेल्या भाविकांनी गर्दी केली होती. कालपासून दिवसभरात लाखावर भाविकांनी कुलदैवत खंडोबाचे दर्शन घेतले. मात्र,चंद्रग्रहणामुळे भाविकांच्या गर्दीवर मोठा परिणाम जाणवला. महाराष्ट्राचे कुलदैवत असल्याने जेजुरीत चैत्र पौर्णिमेला मोठी गर्दी असते, कुलधर्म कुळाचाराचे कार्यक्रम उरकण्यासाठी अडीच-तीन लाखांवर भाविक दर वर्षी जेजुरीला येत असतात. या वर्षी ग्रहणाचा योग असल्याने गर्दीवर परिणाम जाणवला. काल शुक्रवारी दुपारी ३.१७ वा. पौर्णिमा सुरू झाली. आज सायंकाळी ५.३७ पर्यंतच तिचा पुण्यकाळ होता. यातच खग्रास चंद्रग्रहण सुरू झाल्याने भाविकांनी जेजुरीस देवदर्शनास येण्याचे टाळले. मात्र उद्यापासून भाविकांची गर्दी वाढेल असा पुजारी, सेवक, व्यापारी वगार्तून कयास व्यक्त केला जात आहे. काल शुक्रवारपासून आज दिवसभरात लाखावर भाविकांनी जेजुरी गडावर जाऊन कुलदैवताचे दर्शन घेतले. वर्षाची कुलदैवताची वारी सफल केली. येथील ऐतिहासिक चिंचबाग, आनंदनगर परिसरात भाविकांची तुरळक गर्दी होती. मोठ्या प्रमाणावर गर्दी राहणार असल्याच्या पार्श्वभूमीवर जेजुरी नगरपालिका प्रशासन, पोलीस प्रशासनाने यात्रेचे नियोजन केले होते. गडावर भाविकांना सुलभ दर्शन व्हावे म्हणून दर्शनरांगांवर सावलीची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती. भाविकांसाठी प्रथमच लाडू प्रसाद विक्रीची सोय करण्यात आल्याचे प्रमुख विश्वस्त डॉ. प्रसाद खंडागळे यांनी सांगितले. शहरात ज्या ज्या ठिकाणी भाविकांची गर्दी होती तिथे पालिका प्रशासनाने टँकरची व्यवस्था केली होती. चारचाकी वाहनांना शहरात प्रवेश नाकारला असल्याने बाजार पटांगण, पालखी मैदान आदी ठिकाणी वाहनव्यवस्था करण्यात आली होती. जेजुरी पोलीस ठाण्याच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (वार्ताहर)४जेजुरी कडेपठार मंदिरात भाविकांची गर्दी होती. भाविकांनी देवदर्शनाबरोबर कुलधर्म कुळाचाराचे कार्यक्रमही उरकले. राज्यभरातून अनेक ठिकाणावरून भाविकांनी आपआपल्या देवघरातील मूर्ती, देवाचे टाक, आदी देवभेटीसाठी आणले होते. ४नाझरे जलाशयावर स्नान, कुलधर्म कुळाचार उरकून भाविक गडावर जाऊन देवदर्शन घेत होते. अनेकांनी आपआपल्या शिखरी काठ्या, उत्सवमूर्तींच्या पालख्याही देवभेटीसाठी आणले होते. भाविक वाजतगाजत मिरवणुकीने जाऊन देवभेट उरकत होते.