परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सामाजिक व सेवाभावी संस्थांनी आरोग्य व्यवस्था उभारण्यासाठी आवश्यक ती मदत कशी करावी याचा आदर्श जीतो पुणे संस्थेने घालून दिला आहे. जीतोने नुकतेच शिवाजीनगरमधील रेव्हेन्यू कॉलनीतील स्पैन एक्झिक्युटिव्ह हॉटेल येथे ७५ बेडचे कोविड केंद्र सुरू केले होते. मात्र, दोनच दिवसांत ते रुग्णांनी भरले. त्यामुळे त्याच ठिकाणी शेजारी असलेल्या भूषण हॉटेलमध्ये दुसरे ४० बेड क्षमतेचे कोविड केंद्र सुरू केले आहे.
या केंद्राचे उद्घाटन नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी जीतो अपेक्सचे उपाध्यक्ष विजय भंडारी, जीतो पुणेचे अध्यक्ष ओमप्रकाश रांका, मुख्य सचिव पंकज कर्नावट, कोविड सेंटरचे डॉ. अशोक संचेती, जीतो रेस्ट ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष कांतिलाल ओसवाल, लखिचंद खिवंसरा, मनोज छाजेड, आदेश खिवंसरा, भूषण ओसवाल, संदीप ओसवाल आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.