शिरूर : शासनाने तृतीयपंथीयांना मतदानाचा हक्क दिल्याने शिरूर मतदारसंघातून एका तृतीयपंथीयाने आपली उमेदवारी जाहीर केली असून, ते आता शिरूरकरांकडे मतदानाचा जोगवा मागणार आहेत. देवीची गाणी म्हणून उदरनिर्वाह करीत असून, जनतेच्या समस्या मीच सोडूव शकतो, असा दावा केला आहे.
संदीप गिरी (वय 3क्) असे त्यांचे नाव आहे. ते येथे आपल्या दोन मित्रंसमवेत राहतात. त्यांचे शिक्षण हे दहावीर्पयत झाले असून, गेल्या काही वर्षापासून ते शिरूर तालुक्यात देवीची गाणी म्हणून जोगवा मागत आहेत. हे करीत असताना शिरूरकरांशी माझा चांगला परिचय झाला आहे. माङयाकडे जास्त पैसा, संपत्ती नाही. त्यामुळे मी मोठय़ा सभा घेऊ शकत नाही. पण मी कोपरा सभा घेऊन योग्य उमेदवार कसा आहे, हे शिरूरकरांना पटवून देणार असल्याचे संदीपने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
ते म्हणाले, की कोणताच पक्ष विश्वासार्ह नसून, निवडून येणारे हे जनतेसाठी नव्हे, तर पैसा कमावणो व स्वार्थ साधण्यासाठीच निवडून येतात. माझी पुढची पिढीच नसल्याने मी कोणासाठी प्रॉपर्टी गोळा करणार आहे? असा सवाल केला.
मी जनजोगती आहे. जनजोगती म्हणजे जो जगासाठी जगतो. जनकल्याणासाठी जगतो तो, अशी माझी व्याख्या आहे. जीवनात काही मिळवायचे नसल्याने निरपेक्षपणो जनतेसाठी काम करण्यासाठी विधानसभा लढवण्याचे मनात आले. याबाबत लोकांच्या प्रतिक्रिया मागवल्या असता आतार्पयत दीड हजारहून अधिक प्रतिक्रिया मिळाल्या असून, निवडणूक लढवावी, असे या लोकांचे मत असल्याचे संदीपने सांगितले. (वार्ताहर)