शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

‘पुनीत बालन ग्रुप’च्या माध्यमातून ३५ सार्वजनिक मंडळांची संयुक्त दहीहंडी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2024 7:56 PM

शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मंडळांचा स्तुत्य निर्णय; ऐतिहासिक लाल महाल चौकात होणार दहीहंडी साजरी

पुणे : प्रतिनिधी - ‘पुनीत बालन ग्रुप’च्या माध्यमातून पुण्यातील ३५ नामांकित सार्वजनिक गणेश मंडळे एकत्र येऊन यावर्षी दहीहंडी उत्सव साजरा करणार आहेत. शहरातील चौकाचौकात होणाऱ्या दहीहंडी कार्यक्रमांमुळे होणारी वाहतूक कोंडी आणि सुरक्षा व्यवस्था यामुळे पोलीस प्रशासनावर येणारा ताण लक्षात घेऊन तो टाळण्यासाठी ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळा’चे उत्सव प्रमुख, विश्वस्त व युवा उद्योजक पुनीत बालन यांनी मंडळांना एकत्र आणत या संयुक्त दहीहंडीचा निर्णय घेतला आहे. ऐतिहासिक अशा लाल महाल चौकात हा दहीहंडीचा कार्यक्रम होणार आहे.

‘पुनीत बालन ग्रुप’चे अध्यक्ष व युवा उद्योजक पुनीत बालन यांनी यासबंधीची माहिती दिली. गेल्या काही वर्षांपासून ‘पुनीत बालन ग्रुप’ आणि गुरुजी तालीम मंडळ एकत्र येऊन दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. अल्पावधीतच ही दहीहंडी लोकप्रिय ठरली. दरम्यान शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. त्यातच अनेक मंडळांकडून प्रमुख रस्ते आणि चौकात दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन केले जात असल्याने वाहतूक कोंडी होऊन नागरिकांचे हाल होतात. सुरक्षा व्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होतो. तसेच प्रत्येक मंडळाने स्वतंत्र दहीहंडी कार्यक्रम आयोजित केल्यास ध्वनी प्रदूषणाचे प्रमाणही वाढते. ही बाब लक्षात घेऊन युवा उद्योजक पुनीत बालन यांनी मंडळाना एकत्र येऊन संयुक्त दहीहंडी करण्यासंबंधीचे आवाहन केले होते. त्यांच्या सामाजिक भावनेतून केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील प्रामुख्याने मध्य पुण्यातील तब्बल ३५ सार्वजनिक मंडळांनी पाठिंबा देत सयुंक्त दहीहंडीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार येत्या दि. २७ ऑगस्ट रोजी कसबा पेठेतील ऐतिहासिक अशा लाल महाल चौकात सार्वजनिक गणेश मंडळांचा संयुक्त दहीहंडी कार्यक्रम होणार आहे. त्यात सर्व पुणेकरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पुनीत बालन यांनी केले आहे. संयुक्त दहीहंडीत सहभागी होणारी मंडळे

- श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट- श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट- श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट- श्रीमंत पेशवे गणपती मंदिर- पुण्येश्वर महादेव मंदिर उत्सव समिती- नवग्रह मित्र मंडळ ट्रस्ट- श्री साने गुरुजी तरुण मंडळ- हुतात्मा भगतसिंग मित्र मंडळ- त्रिमूर्ती मित्र मंडळ (माणिक चौक)- जनार्दन पवळे संघ- सुयोग मित्र मंडळ संयुक्त सिद्धीविनायक मित्र मंडळ- क्रांतीवीर राजगुरु मंडळ- श्री हनुमान मंडळ (अग्रवाल तालीम)- क्रांतीरत्न चंद्रशेखर आझाद मंडळ- जनता जनार्दन मंडळ- विजय अरुण मंडळ ट्रस्ट - व्यवहार आळी चौक मंडळ- श्री अभिमन्यू मंडळ ट्रस्ट- श्रीकृष्ण मित्र मंडळ- फणी आळी तालीम ट्रस्ट- तरूण शिवगणेश मित्र मंडळ ट्रस्ट- ऑस्कर मित्र मंडळ - प्रकाश मित्र मंडळ- लोखंडे तालीम संघ- त्वष्टा कासार समाज संस्था- भोईराज मित्र मंडळ- थोरले बाजीराव मित्र मंडळ- भरत मित्र मंडळ- प्रभात प्रतिष्ठान- लाल महाल नवरात्रौ उत्सव समिती- श्री कसबा गणपती शिवजयंती उत्सव मंडळ- सूर्योदय प्रतिष्ठान, खराडी- गणेश मित्र मंडळ (अलका चौक)- श्री गजानन मंडळ (लक्ष्मी रोड)- गुरुदत्त मित्र मंडळ (मंडई)

‘‘दरवर्षी शहरात अनेक सार्वजनिक मंडळांकडून दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. मात्र, उत्सवाच्या या वाढत्या स्वरुपाने पोलीस प्रशासनावर सुरक्षा व्यवस्थेचा ताण पडतो, वाहतूक कोंडी होते आणि ध्वनी प्रदूषणही होते. त्यातून मार्ग काढून पोलिस बाधवांना सहकार्य करण्याच्यादृष्टीने आणि पुणेकरांना त्रास होऊ नये, यासाठी आम्ही यावर्षी संयुक्त दहीहंडी उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. जवळपास सर्वच प्रमुख सार्वजनिक मंडळांनी या निर्णयाला पाठिंबा देत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. त्या सर्व मंडळांचे आम्ही मनापासून आभारी आहोत.’’                - पुनीत बालनउत्सव प्रमुख व विश्वस्त (श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट)

टॅग्स :Dahi Handiदहीहंडी