पुणे : पुण्यात एनआयए (National Investigation Agency- NIA) आणि आयबीने (Intelligence Bureau-IB) छापेमारी केली आहे. शहरातील कोंढवा परिसरात या हे छापे टाकण्यात आले आहेत. या कारवाईत एकाला ताब्यात घेण्याता आले आहे. आज पहाटे कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील वजीर कस्केड सोसायटीमध्ये छापेमारी करून कारवाई केली. जुबेर शेख (वय ३९ वर्ष) यास चौकशीसाठी राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) व आयबीने संयुक्त रित्या छापा मारून ताब्यात घेतले. त्याच्याकडून काही महत्त्वाची कागदपत्रे पुढील तपासाकरिता ताब्यात घेण्यात आली आहेत.
आज (३ जुलै) पहाटे ४ वाजता कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील वजीर कस्केड सोसायटी, नुरणी कब्रस्तान जवळ, चौथा मजला, फ्लॅट न ४२, A wing कोंढवा पुणे येथे ही कारवाई केली. यामध्ये जुबेर शेख (वय ३९) याला ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईच्या वेळी घटनास्थळी पंचनामा करण्यात आलेला आहे. यावेळी कोंढवा पोलीस स्टेशन कडील पोलीस निरीक्षक संजय मोगले (गुन्हे), गोपनीय अंमलदार, तपास पथक स्टाफ, महिला पोलीस अंमलदार असे हजर होते.