आमदाबाद फाटा (ता.शिरूर ) येथे शिरूर तालुका पत्रकार संघाचे वतीने आयोजित वार्षिक स्नेहमेळावा , कोरोना योद्धा सन्मान व शिरूर तालुका सोशल मिडिया शाखेच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित ते बोलत होते . शिरूर हवेलीचे आमदार ॲड अशोक पवार यांसह मान्यवर उपस्थित होते .
यावेळी शिरूर - हवेलीचे आमदार ॲड अशोक पवार , माजी आमदार पोपटराव गावडे , शिरूर - आंबेगांव राष्ट्रवादी काँगेस पार्टीचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर ,शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक प्रविण खानापुरे , शिरूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय बारहते यांनी विचार मांडले .
यावेळी शिरूर तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ . राजेंद्र शिंदे , डॉ दामोदर मोरे , महावितरणचे विभागीय अधिकारी राजेंद्र एडके , नितिन महाजन ,घोडगंगाचे तज्ज्ञ संचालक धरमचंद फुलपगर ,शिरुरचे पोलिस निरिक्षक प्रविण खानापुरे , रांजणगावचे पोलिस निरिक्षक भारतकुमार राऊत , शिक्रापुरचे पोलिस निरिक्षक हेमंत शेडगे , शिरूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय बारहाते , उद्योजक आबासाहेब पवार , नाना फुलसुंदर , अशोक माशेरे यांना मान्यवरांच्या हस्ते योद्धा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला .
यावेळी शिरूर तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी , सदस्य तसेच जिल्हा व राज्य पातळीवरील पदाधिकारी उपस्थित होते
पत्रकार भवन उभारण्याचा निर्धार
शिरूर तालुक्यातील पत्रकार बाधवांसाठी तालुक्यात मध्यवर्ती ठिकाणी एक पत्रकार भवन असावे ,ही पत्रकारांची जुनी मागणी आहे . यासाठी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी अनेक वेळा अनेक राजाकिय नेत्यांकडे पाठपुरावा केला . मात्र प्रत्येकाने हा विषय गोड बोलवून टोलवून लावला . त्यामुळे कोणा राजकिय व्यक्तिंचे या कामी सहकार्य मिळेल ही आशा मावळली आहे . म्हणुन सर्व पत्रकांरांनी आपल्याच हिंमतीवर भवन उभारण्याचा निर्धार केला आहे .
शिरूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय बारहाते यांना कोविड योद्धा पुरस्काराने सन्मानित करताना मान्यवर .