शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
3
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
4
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
5
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
6
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
7
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
8
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
9
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
10
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
11
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
12
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
13
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
14
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
15
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
16
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
17
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
18
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
19
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

आर्थिक लुटीचा प्रवास सुरू आहे बिनधास्त

By admin | Published: April 18, 2017 2:56 AM

शाळांना सुटी लागल्यामुळे नागरिकांना गावाकडे जायची ओढ निर्माण झाली आहे. घराजवळच ट्रॅव्हल्स उपलब्ध होत आहेत.

पिंपरी : शाळांना सुटी लागल्यामुळे नागरिकांना गावाकडे जायची ओढ निर्माण झाली आहे. घराजवळच ट्रॅव्हल्स उपलब्ध होत आहेत. पण ट्रॅव्हल्सच्या मालकाने मनमानी पद्धतीने भाडेवाढ केली आहे. त्याचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. एसटीच्या अपुऱ्या सुविधांमुळे नागरिकांना ट्रॅव्हल्सचा आधार घ्यावा लागत आहे. आर्थिक लुटीच्या प्रवासाबाबत ‘लोकमत’ टीमने केलेली पाहणी...रहाटणी : ट्रॅव्हल्स कंपनीच्या मालकांनी मनमानी भाडेवसुली सुरु केली असल्याने प्रवासी मेटाकुटीला आले आहेत. मनमानी भाडेवाढ म्हणजे प्रवाशांची लूटच असल्याचे बोलले जात आहे. अशा मनमानी भाडेवाढीवर प्रशासनाने नियंत्रण ठेवण्याची माफक अपेक्षा प्रवासी करीत आहेत. शाळांना सुटी लागल्याने उन्हाळ्यात प्रवाशांची गर्दी वाढली आहे. रेल्वेगाड्यांचे आरक्षणही फुल्ल झाले आहे. त्यामुळे कुटुंबासह प्रवास करणारे प्रवासी खासगी ट्रॅव्हल्सकडे वळाले आहेत. खासगी ट्रॅव्हल्सधारकांनी प्रवासी भाड्यात मनमानी पद्धतीने भरमसाट वाढ केली असल्यामुळे प्रवाशांना प्रवास सुखाचा व्हावा, यासाठी अधिक रक्कम मोजावी लागत आहे.उन्हाळ्यात मुलांना सुटी लागली, की बहुतांश पालक बाहेरगावी जाण्याचे ‘प्लॅनिंग’ करतात. त्यामुळे रेल्वेगाड्यांचे आरक्षण तीन महिन्यांपूर्वीच फुल्ल होऊन जाते. यामुळे प्रवासी सध्या खासगी ट्रॅव्हल्सच्या प्रवासाला पसंती देत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातून राज्यातील व राज्याबाहेरील विविध शहरांत जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सच्या संचालकांनी तिकिटाचे दर अचानक वाढविले आहेत. कुटुंबासह प्रवास सुखाचा होण्यासाठी बहुतांश प्रवासी जादा रक्कम मोजून खासगी ट्रॅव्हल्सने प्रवास करीत आहेत. उन्हाळ्यात दर वर्षी १0 ते १५ टक्के आणि दिवाळीच्या सिझनमध्ये ५0 टक्क्यांवर खासगी ट्रॅव्हल्सचे प्रवासभाडे वाढविण्यात येत असल्याचे ट्रॅव्हल्सच्या संचालकांनी सांगितले. मात्र, पिंपरी-चिंचवड शहरातून सर्वाधिक खासगी बस लातूर, उदगीर, निलंगा, नांदेड, बीड, औरंगाबाद, उस्मानाबाद, अकोला, नागपूर, अमरावती, यवतमाळ, जळगाव, भुसावळ, कोल्हापूर यासह परराज्यांतही रोज शेकडो खासगी प्रवासी साध्या, वातानुकुलित, स्लीपर कोच सुविधा असणाऱ्या बसमधून प्रवास करीत आहेत. उन्हाळी सुटी लागली म्हणून लगेच भाडेवाढ केली जाते असे नाही, तर ज्या आठवड्यात लग्नाच्या तारखा आहेत, हे पाहून भाडेवाढ केली जाते. तसेच या दिवसांत शुक्रवार, शनिवार व रविवार या दिवशी हमखास भाडेवाढ केली जाते. (वार्ताहर)दाद कोणाकडे मागायची?निगडी :दर वर्षी उन्हाळी सुटीत नागरिक मोठ्या प्रमाणात गावाकडे ये-जा करतात. त्यामुळे या सिझनमध्ये प्रवासी संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होते. अनेक प्रवासी रेल्वेचे आगाऊ तिकीट बुक करून ठेवतात. काही प्रवासी एसटी बसने प्रवास करतात. मात्र सर्वसामान्य नागरिकांना, कामगार वर्गाला हे जमतेच असे नाही. त्यामुळे बहुतांश प्रवासी ऐन वेळी खासगी बसकडे वळतात याचाच फायदा घेत खासगी बसमालक अचानक भाडेवाढ करतात. अशा भाडेवाढीमुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. अशी अचानक भाडेवाढ कशासाठी अशी विचारणा केली, तर याचे काही उत्तर नसते. मग ही मनमानी भाडे वाढ का, असा संतप्त सवाल प्रवासी उपस्थित करीत आहेत. या भाडेवाढीवर नियंत्रण कोणाचे हा खरा प्रश्न आहे. ट्रॅव्हल्सच्या भाड्याची प्रतीक्षापिंपळे गुरव : मुलांच्या शालेय परीक्षा संपल्याने व उन्हाळी सुटीत गावी जाण्यासाठी धावपळ सुरू आहे. मात्र ट्रव्हल्सवाले प्रवाशांकडून या ना त्या कारणाने जास्तीची रक्कम वसूल केली जात आहे.नवी सांगवीच्या साई चौकांमध्ये टॅ्रव्हलची बुकिंग सुरू असते. सांगवी, दापोडी व पिंपळे गुरव परिसरात बाहेरच्या जिल्ह्यांतील हजारो नागरिक नोकरीच्या निमित्ताने वास्तव्य करीत आहेत. त्यामध्ये सोलापूर, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी, उमरगा, आंबेजोगाई आदी ठिकाणचे नागरिक आपल्या मूळ गावी जाण्यासाठी सोयीस्कर वाहन म्हणून ट्रॅव्हलकडे पाहतात. मात्र ट्रॅव्हलवाल्यांकडून प्रवाशांची फसवणूक होत असल्याचे प्रवाशांनी सांगितले.अडचणीचा घेतला जातो फायदा!दिघी : परिसरातील बहुतांश रहिवासी मराठवाडा, विदर्भ, खानदेशमधून आले आहेत. नोकरीच्या निमित्ताने कायम रहिवासी झाले आहेत. खासगी ट्रॅव्हल्सशिवाय दुसरा पर्याय नाही. ही प्रवाशांची अडचण समजून ट्रॅव्हल्सवाल्यांनी प्रवासभाडे मनमानी आकारत नागरिकांची आर्थिक लूट करीत असल्याची सत्य परिस्थिती आहे. रेल्वे आरक्षण मिळण्याची शाश्वती नाही. एसटीचा प्रवास समाधानकारक नाही. त्यामुळे नागरिकांचा ओढा खासगी ट्रॅव्हल्सकडे वळाल्याने ट्रॅव्हल्सवाल्यांचे फावले आहे. उन्हाळ्याच्या सुट्या, दिवाळी, लग्नसराई, नाताळ, ईद अशा सणासुदीच्या दिवसाला तिकिटाचे दर गगनाला भिडलेले असतात. इतर वेळी पाचशे रुपये असणारे प्रवासी भाडे सणाच्या दिवशी हजार ते पंधराशे रुपयांपर्यंत, तर दिवाळीच्या सुटीत दोन-तीन हजारांवर जाऊन पोहोचते. आता मुलांच्या परीक्षा संपून सुट्या लागल्या आहेत.