लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : स्वरांजली आणि भारती विद्यापीठ डीम्ड युनिव्हर्सिटी स्कूल आॅफ परफॉर्मिंग आर्ट्सतर्फे स्वरानुभूती या शास्त्रीय संगीत संध्येचे आयोजन करण्यात आले असून, त्यात संवादिनी आणि बासरीची जुगलबंदी अनुभवण्याची संधी संगीतप्रेमींना मिळणार आहे. येत्या रविवारी (दि. १४) सायंकाळी साडेपाच वाजता कोथरूड येथील बालशिक्षण मंदिर सभागृहात हा कार्यक्रम होईल. कार्यक्रमात पं. मोहन दरेकर यांचे गायन होणार आहे. त्यांना स्वानंद कुलकर्णी (हार्मोनियम) आणि अविनाश पाटील (तबला) साथसंगत करतील. त्यानंतर बासरी आणि संवादिनी यांची आगळीवेगळी जुगलबंदी रसिकांसमोर सादर केली जाणार आहे. प्रख्यात बासरीवादक पं. रोणू मुजूमदार आणि पं. मनोहर चिमोटे यांचे शिष्य पं. शारंगधर साठे (संवादिनी) यांची जुगलबंदी रसिकांसाठी खास पर्वणी ठरणार आहे. त्यांना अजिंक्य जोशी (तबला) साथसंगत करणार आहेत.
संवादिनी-बासरीची रंगणार जुगलबंदी
By admin | Published: May 11, 2017 4:58 AM