दावडी : पुणे-नाशिक महामार्गावर खेड पोलिसांच्या वतीने जंबो नाकाबंदी करण्यात आली. यात २२८ वाहनांवर कारवाई करून ६२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.पोलीस उपअधीक्षक राम पठारे यांच्या आदेशानुसार खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे-नाशिक महामार्गावर चांडोली टोल नाक्याजवळ आज सकाळीपासून दिवसभर ही कारवाई करण्यात आली. नाकाबंदीसाठी खेड पोलीस स्टेशनचे तीन पोलीस अधिकारी व २२ पोलीस सहभागी झाले होते.पुणे-नाशिक महामार्गावर आज केलेल्या कारवाईत अनेक वाहनचालकांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी त्यांना पाठलाग करून पकडून दंड वसूल केला. हेल्मेटचा वापर न करणे, वाहनाची कागदपत्रे नसणे, वाहनचालक परवाना नसणे, दारू पिऊन वाहन चालवणे, ट्रिपल सीट, सीट बेल्ट, लेन कटिंग, जास्त प्रवाशी बसविणे, अवैध वाहतूक आदीबाबत वाहने व वाहनचालकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. चाकण बाजूकडून खेडकडे पुणे-नाशिक महामार्गावरून येणाऱ्या वाहनांना अडवून ही कारवाई करण्यात येत होती.तीन पोलीस अधिकारी, २२ पोलीस कर्मचारी यांनी ठिकाणी नाकाबंदी करण्यासाठी सहभाग घेतला. (वार्ताहर)
खेड पोलिसांची जंबो नाकाबंदी
By admin | Published: April 26, 2017 2:49 AM