जुन्नर : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत विद्या प्राधिकरण, पुणे यांनी केलेल्या अध्ययन संपादणूक विश्लेषणात जुन्नर तालुक्याने पहिल्या वीस तालुक्यांत स्थान मिळविले असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी के. डी. भुजबळ यांनी दिली.प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाचा राज्याचा अहवाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार तालुक्याची क्रमवारी उपलब्ध झाली आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत जुलै २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या पायाभूत चाचणीचे विद्या प्राधिकरण पुणे यांनी विश्लेषण केले.तर केंद्रांनिहाय घेण्यात आलेल्या पहिल्या ५० स्थानामध्येदेखील जुन्नर तालुक्यातील विविध केंद्रांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यामध्ये जुलै २०१६ मध्ये झालेल्या पायाभूत चाचणीमध्ये प्रथम भाषेत खामुंडी केंद्र ९४.५७% गुण मिळवत राज्यात १४वे, हिवरेत नारायणगाव केंद्र ९०.२५ % गुण मिळवत राज्यात ४५ वे, गुंजाळवाडी केंद्र ९०.१५% गुण मिळवत राज्यात ४७ वे, तर गणित विषयांमध्ये गुंजाळवाडी केंद्र ९०.१५% गुण मिळवत राज्यात ७ वे, तर उदापूर केंद्र ८९.८८% गुण मिळवत राज्यात ८ व्या स्थानावर आहे.यशस्वी विद्यार्थी, शाळा, मार्गदर्शक शिक्षक यांचे पंचायत समिती सभापती ललिता चव्हाण, उपसभापती उदय भोपे, गटविकास अधिकारी सतीश गाढवे, शिक्षण विस्तार अधिकारी अशोक लांडे आदींनी अभिनंदन केले.कौतुकास्पद कामगिरी४अध्ययन संपादणूक विश्लेषणात जुन्नर तालुका मराठी विषयात ८३.०१% गुण संपादित करत राज्यात २० वे स्थान पटकाविले आहे, तर गणित विषयात ८१.९५% गुण मिळवत राज्यात १८ वे स्थान प्राप्त केले. तर, आॅक्टोबर २०१६ मध्ये झालेल्या संकलित चाचणी (१) मध्ये भाषा विषयात ८०.८४ % गुण मिळवत राज्यात १४ वा क्रमांक, तर गणित विषयात ८३.६६% गुण मिळवत राज्यात १५ वा क्रमांक मिळविला आहे.
पहिल्या २० तालुक्यांत जुन्नर ठरले ‘प्रगत’
By admin | Published: March 26, 2017 1:33 AM