राजगुरुनगर : राजगुरुनगर येथील पुणे-नाशिक महामार्गाचे बाह्यवळणाचे काम रखडले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून हे काम बंद आहे. त्यामुळे बाह्यवळणाचे काम कधी पूर्ण होणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.शहराच्या बाह्यवळणाबाबतचा तिढा मिटला असून, जमिनीच्या संपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. शेतकºयांना जमिनींचा मोबदला मिळाला आहे. कुठल्याही शेतक-याची बाह्यवळण शेतजमिनीतून करण्यासाठी हरकत राहिलेली नाही. दोन महिन्यांपूर्वी (दि. ३० सप्टेंबर) दस-याच्या दिवशी मोठा गाजावाजा करून बाह्यवळणाच्या कामाला सुरुवात झाली होती. शेतकºयांच्या उभ्या पिकांतून तसेच झाडेझुडपे जेसीबी, पॉकलंड यंत्राद्वारे उखडून काढण्यात येऊन रस्त्या तयार करण्यास सुरुवात केली होती. रस्ता होणार आहे तेथे दोन्ही बाजूंनी चर उकरले; मात्र फक्त चार दिवस काम सुरू होते. त्यानंतर हे काम बंद पडले आहे ते अद्यापही सुरू झालेले नाही.रस्त्याचे काम करणारी मशिनरी उभी आहेत. शेतकºयांच्या शेतात चर खोदल्यामुळे त्या परिसरातील शिल्लक राहिलेल्या क्षेत्रात जाता येत नाही, तसेच कुठलेही पीक घेता येत नाही. जमिनीचा मोबदला मिळला; पण बंद पडलेले काम कधी सुरू होणार, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.पुणे-नाशिक महामार्ग चौपदरीकरण कामातील राजगुरुनगर बाह्यवळण क्षेत्रात संपादित होणाºया जमिनीच्या नुकसानभरपाईची रक्कम वाटप करण्यात आली. या वेळी अडचण असलेल्या शेतकºयांचे म्हणणे आधिकाºयांनी ऐकून त्यावर तोडगा काढून बाह्यवळणाचा तिढा सोडविला होता.१0१ शेतकरी : २३.३९ हेक्टर संपादित होणार23.39 हेक्टरराजगुरुनगर, चांडोली, होलेवाडी, ढोरे-भांबुरवाडी व राक्षेवाडी या गावांतील १०१ शेतकºयांचे मिळून २३.३९ हेक्टर क्षेत्र बाह्यवळण कामासाठी संपादित होणार आहे.चांडोली येथे संभाव्य बिनशेती क्षेत्राच्या गुंठ्याला ७ लाख ४७ हजार रुपये, तर खरेदी-विक्री व्यवहारानुसार ठरलेल्या क्षेत्रातील गुंठ्याला ५ लाख ४६ हजार रुपये नुकसानभरपाई देण्यात आली आहे.राजगुरुनगरला प्रतिगुंठा४ लाख ५८ हजार रुपये तर ढोरे-भांबुरवाडी, राक्षेवाडी, होलेवाडी या गावांमध्ये प्रतिगुंठा ४ लाख ४३ हजार रुपये नुकसानभरपाई शेतकºयांना मिळाली आहे....तरच राजगुरुनगरची कोंडी सुटेलहे काम गेल्या दोन महिन्यांपासून बंद आहे. हे काम लवकर सुरू करावे, अशी मागणी होत आहे. लवकरच भीमा नदीपात्रावरील पूल व बाह्यवळणाचे काम हाती घ्यावे.त्यामुळे नाशिकहून येणारी वाहने राजगुरुनगरमध्ये न शिरता बाह्यवळण रस्त्यावरून थेट पुण्याला जातील. तसेच, यामुळे राजगुरुनगर शहरात होणारी वाहतूककोंंडी न होता रस्ता राजगुरुनगरकरांना वाहतुकीसाठी सुलभ होईल.बाह्यवळणबाधित शेतकºयांची एकही तक्रार पेंडिंग ठेवलेली नाही व तक्रारींचे निवारण केले आहे. बाह्यवळणाचे काम रखडले आहे, हे मला माहीत आहे. याबाबत मी राष्ट्रीय महामार्ग अधिकारी, संबंधित रस्ताबांधणी अधिकाºयांशी बाह्यवळणाचे काम सुरू करावे, याबाबत पत्रव्यवहार केला आहे.-आयुष प्रसादउपविभागीय आधिकारी खेड विभागबाह्यवळणाचे काम करणाºया ठेकेदाराने काम सोडले आहे. दुसरा ठेकेदार नेमून बाह्यवळणाचे काम सुरू करण्यात येणार आहे. येत्या १५ दिवसांत रस्त्याच्या कामाला सुरुवात होईल.- मणी रामणरस्ताबांधणी कंपनी व्यवस्थापक
राजगुरुनगरला बाह्यवळणाचे काम ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 3:04 AM