नारायणगाव - ग्रामपंचायत बोरी (खु.) येथील गट नं़ ८४४ या सरकारी गायरान जागेत अतिक्रमणाची कारवाई न करणे देखभालीसाठी असलेल्या गायरान जमिनीवर झालेल्या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष करणे, कायदेशीर व प्रशासकीय कारवाई न करणे, वरिष्ठांच्या सुचनांचे पालन न करणे, पदाचा गैरवापर करून अतिक्रमणाला पाठबळ देणे आदी बाबींचा ठपका ठेवत बोरी खुर्द ग्रामपंचायतीच्या तत्कालीन व विद्यमान ग्रामसेवकांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, तसेच तत्कालीन सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्याची शिफारस जुन्नर पंचायत समितीच्या वतीने जिल्हा परिषदेकडे करण्यात आली आहे़सरकारी गायरान जागेत बेकायदशीरपणे उसाची लागवड केल्याची तक्रार नितीन काळे, जीवन गावडे, रोहन बेल्हेकर व इतर ग्रामस्थांनी १४ फेब्रुवारी २०१८ रोजी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाºयांकडे केली होती़ त्यानुसार पंचायत समिती जुन्नरच्या वतीने चौकशीसाठी विस्तार अधिकाºयांची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच, गटविकास अधिकाºयांनी घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली होती़ या चौकशीतून ग्रामसेवकांसह सरपंच व सर्व सदस्य यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता़ अतिक्रमणाबाबत ग्रामपंचायत ठरावानुसार कारवाई न केल्याबत्तल तत्कालीन ग्रामसेवक पी. जी. खंडागळे यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. अतिक्रमणाबाबत ६ महिने दुर्लक्ष केल्याबद्दल विद्यमान ग्रामसेवक ए़ बी़ लेंडे, तत्कालीन सरपंच व उपसरपंच कैलास काळे यांच्यासह सर्व सदस्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे़नियमानुसार कारवाई न केल्याबद्दल तत्कालीन ग्रामसेवक पी. जी. खंडागळे, तत्कालीन ग्रामसेविका एस. ए. शेरकर, विद्यमान ग्रामसेवक ए़ बी़ लेंडे यांच्यासह तत्कालीन सरपंच पांडुरंग काळे, उपसरपंच कैलास काळे व सर्व सदस्य यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.जुन्नर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) यांना पाठविलेल्या शिफारसपत्रात बोरी खुर्दचे सर्व ग्रामसेवक यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे स्पष्ट झाल्याने संबंधित ग्रामसेवक हे शिस्तभंगास पात्र आहेत व बोरी खुर्दचे सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य हे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३९(१) नुसार कारवाईस पात्र आहेत़ अर्थात, या सर्वांवर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी, असे या शिफारशीमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.कायदेशीर व प्रशासकीय कारवाई न केल्याचा ठपकाअतिक्रमण निदर्शनास आल्यानंतर १० महिने कोणत्याही स्वरूपाची कायदेशीर व प्रशासकीय कारवाई न केल्याचा ठपका विद्यमान ग्रामसेवक ए़ बी़ लेंडे व तत्कालीन ग्रामसेविका श्रीमती एस़ ए़ शेरकर यांच्येसह तत्कालीन सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य यांच्यावर ठेवण्यात आला आहे़ या प्रकरणामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.वरिष्ठ कार्यालयाने दिलेल्या लेखी सूचनांचे पालन न केल्याबद्दल ग्रामसेवक ए़ बी़ लेंडे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी शिफारस करण्यात आली आहे़ स्वत:च्या पदाचा व अधिकाराचा गैरवापर करून अतिक्रमणास पाठबळ केल्याचा ठपकाही या प्रकरणात उपसरपंचांवर ठेवण्यात आला आहे.पंचायत समितीने कारवाई करण्याबाबत शिफारस केली असल्याचे पत्र ग्रामपंचायत कार्यालयात प्राप्त झालेले नाही. गायरान जागेत जो ऊस लावला तो ग्रामपंचायतीच्या नावे लावण्यात आला होता व त्याचे पैसे ग्रामपंचायतीमध्ये जमा झालेले आहेत.- ज्ञानेश्वर शेटे, सरपंच, बोरी खुर्द
जुन्नर पंचायत समिती : ग्रामसेवकांसह सरपंचावर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2018 2:43 AM