Junnar Vidhan Sabha Election Result 2024 Live: जुन्नरला इतिहास घडला! अपक्ष उमेदवाराने मैदान मारले, सोनवणे विजयी, शेरकरांचा पराभव
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 06:00 PM2024-11-23T18:00:17+5:302024-11-23T18:03:08+5:30
Junnar Assembly Election 2024 Result Live Updates: अपक्ष उमेदवार शरद सोनवणे यांनी विजय मिळवत शरद पवार गटाच्या सत्यशील शेरकर आणि अजित पवार गटाच्या अतुल बेनके यांचा पराभव केला
Junnar Vidhan Sabha Election Result 2024 Live: संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या व पंचरंगी लढत होत असलेल्या जुन्नर तालुक्यात सर्वच राजकीय जानकारांचे आडाखे चुकवत अपक्ष उमेदवार माजी आमदार शरद सोनवणे यांनी ७३ हजार ३५५ मते मिळवत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार सत्यशील शेरकर यांचा पराभव केला आहे. शेरकर यांच्यापेक्षा ६ हजार ६६४ अधिक मते मिळवत विजयाचा इतिहास घडविला.
जुन्नर विधानसभेच्या इतिहासात अपक्ष उमेदवाराने विजय मिळविण्याची ही पहिलीच वेळ आहे. तिसऱ्या फेरीपासून घेतलेली शरद सोनवणे यांनी आघाडी शेवटपर्यंत टिकवली. शेवटच्या दोन-तीन फेऱ्यांमध्ये सोनवणे यांची आघाडी काहीशी कशी कमी झाली असली तरी प्रत्येक फेरीत मिळालेल्या सातत्यपूर्ण मतांनी सोनवणे यांच्या काळात विजयमाला पडली. ६६ हजार ६९१ मते मिळवीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार सत्यशील शेरकर दुसऱ्या क्रमांकावर राहीले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान आमदार अतुल बेनके मते ४८ हजार १०० मिळवुन तिसऱ्या क्रमांकावर राहिले. वंचित आघाडीचे उमेदवार देवराम लांडे मते २२४०१ मते मिळवत चतुर्थ क्रमांकावर राहीले. सुरुवातीच्या दोन फेऱ्यात मोठी आघाडी घेतलेले वंचित आघाडीचे देवराम लांडे हे मात्र नंतर पिछाडीवर पडले. मागील निवडणुकीत जवळपास ५०००० मते मिळवलेल्या उमेदवार आशाताई बुचके यांना या वेळी ९ हजार ४३५ मते मिळाली. त्यांना पाचव्या स्थानावर राहावे लागले.
जुन्नर तालुक्याच्या पर्यटन विकासासाठी पाच हजार कोटींचा आराखड्या साठी पाठपुरावा करणार आहे. बिबट सफर चे काम लवकरच मार्गी लावणार आहोत. जनतेने मला अपक्ष उमेदवार म्हणून निवडून दिले आहे .मी कोणत्या पक्षात जाणार नाही ज्या पक्षाचे सरकार येईल त्यांना पाठिंबा देईल. विकास कामांसाठी महायुतीच्या पाठीशी उभा राहील. निवडणुकीपुर्वी शिवसेना शिंदे गटातुन पक्षातून निलंबन केले हा प्रश्न विचारला असता सोनवणे म्हणाले, ते निलंबन वरचे आहे त्याला मनावर घ्यायचे नसते. सर्व नेतेमंडळी एका बाजूला गेले परंतु सर्वसामान्य जनता माझ्या मागे राहिली. बाळासाहेब दांगट माझे राजकीय गुरू आहेत ते शेलार मामाप्रमाणे माझ्या पाठीमागे उभे राहिले. - शरद सोनावणे