पुणे : पुणे महानगर परिवहन (पीएमपी) महामंडळाच्या ताफ्यामध्ये सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) आणि भाडेतत्त्वाने ठेकेदारांच्या बस बंद पडल्या तर त्यांच्याकडून ५ हजार रुपये दंड वसूल करण्याचा आदेश अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी काढला आहे. याचा धसका ठेकेदारांनी घेतला असून, सोमवारी रस्त्यावर ७० बस कमी सोडल्या. रस्त्यावर सोडलेल्या ६७२ बसमधील ९२ बस ब्रेकडाऊन झाल्या. ठेकेदारांकडून पीएमपीला दररोज ८५३ बस पुरविल्या जातात. पण त्यातील दररोज रस्त्यावर सोडल्या जाणाऱ्या ७४० बसपैकी ५० बस रस्त्यावर बंद अर्थात ब्रेकडाऊन होतात. हे प्रमाण कमी करण्यासाठी पीएमपीच्या ताफ्यामध्ये असलेल्या ठेकेदारांच्या बसचे बे्रकडाऊन कमी करण्यासाठी ठेकेदारांकडून प्रत्येक बसमागे ५ हजार रुपये दंड आकारण्याचे आदेश पीएमपीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी पीएमपी प्रशासनाला ११ एप्रिल रोजी दिले होते. ठेकेदारांनीे दंड चुकविण्यासाठी रस्त्यावर बस सोडण्याचे प्रमाणच कमी केले आहे. भाड्याच्या ६५३ बसपैकी ५७० आणि पीपीपीच्या २००पैकी १७० अशा एकूण ७४० बस रस्त्यावर सोडल्या जात होत्या. बसच्या बे्रेकडाऊनचा दंड भरण्यापेक्षा रस्त्यावर बस कमी सोडण्याचा फंडा ठेकेदारांनी स्वीकारला आहे.
दंड चुकविण्यासाठी बस कमी
By admin | Published: April 18, 2017 3:06 AM