नुकतेच जेलमधून सुटले, आता ईडीने उचलले; मंगलदास बांदल आहेत तरी कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 09:39 PM2024-08-22T21:39:44+5:302024-08-22T21:40:08+5:30

मंगळवारी पहाटेच्या सुमारास पुणे जिल्ह्यातील त्यांच्या निवासस्थानी अचानक ईडीचे अधिकारी पोहोचले..छापेमारी सुरू झाली.. आणि त्यानंतर सायंकाळच्या सुमारास मंगलदास बांदल यांना ईडीने अटक केली..

Just released from jail, now picked up by ED; Who is Mangaldas Bandal? | नुकतेच जेलमधून सुटले, आता ईडीने उचलले; मंगलदास बांदल आहेत तरी कोण?

नुकतेच जेलमधून सुटले, आता ईडीने उचलले; मंगलदास बांदल आहेत तरी कोण?

 किरण शिंदे 

पुणे: पैलवान मंगलदास बांदल.. पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती.. जिल्ह्याच्या राजकारणात त्यांच्या नावाची सतत चर्चा असते.. शिरूर हवेलीच्या राजकारणातील एक महत्त्वाचा चेहरा म्हणूनही त्यांची ओळख आहे.. पुणे जिल्हा बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल असलेल्या पुण्यात जवळपास २० महिने ते तुरुंगात होते. लोकसभा निवडणुकीआधी त्यांची तुरुंगातून सुटका झाली होती.. मात्र हेच मंगलदास बांदल आता ईडीच्या तावडीत सापडलेत.. मंगळवारी पहाटेच्या सुमारास पुणे जिल्ह्यातील त्यांच्या निवासस्थानी अचानक ईडीचे अधिकारी पोहोचले..छापेमारी सुरू झाली.. आणि त्यानंतर सायंकाळच्या सुमारास मंगलदास बांदल यांना ईडीने अटक केली..

मंगलदास बांदल यांची पुणे आणि शिरूर या ठिकाणी आलिशान बंगले आहेत.. त्यांच्या या बंगल्यात मंगळवारी सकाळी अचानक ईडीचे अधिकारी येऊन धडकले.. या अधिकाऱ्यांनी अचानक छापेमारी केली.. बांदल यांच्या आलिशान बंगल्यात तब्बल ५ कोटी ६० लाखाची रोख रक्कम, ५ आलिशान गाड्या, कोट्यावधी रुपये किमतीची चार मनगटी घड्याळं आणि महत्त्वाची कागदपत्र सापडली..त्यानंतर तब्बल १६ तासांच्या चौकशीअंती ईडीच्या अधिकाऱ्यांनी मंगलदास बांदल यांना अटक केली.. बुधवारी त्यांना न्यायालयात हजर केलं असता 29 ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी सुनावली..

मंगलदास बांदल पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे माजी सभापती राहिलेत.. राजकारणी म्हणून त्यांची ओळख आहेत.. सोबतच पैलवान म्हणूनही ते पुणे जिल्ह्यात ओळखले जातात.. त्याशिवाय वेगवेगळे गुन्हे दाखल झाल्याने ते नेहमीच वादात राहिले आहेत..खंडणी उकळणे, फसवणूक करणे यासह विविध कारणामुळे बांदल यांच्यावर गुन्हे दाखल आहेत.. पुणे जिल्हा बँकेच्या कथित फसवणूक प्रकरणात जवळपास २० महिने ते तुरुंगात होते.. लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी ते जामीनावर तुरुंगातून बाहेर आले होते.. 

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मंगलदास बांदल यांनी वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांच्या भेटी गाठी घेत पुन्हा राजकारणात बस्तान बसवण्यासाठी प्रयत्न केले .. मात्र कोणत्याही पक्षाने त्यांना जवळ केल नाही.. अपवाद होता वंचित बहुजन आघाडीचा.. शिरूर लोकसभेसाठी वंचितकडून बांदल यांना उमेदवारी देण्यात आली.. मात्र त्यांची एक चूक त्यांना महागात पडली. त्याचं झालं असं की लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी इंदापूर मध्ये भाजपचा मेळावा आयोजित केला होता देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते आणि याच मेळाव्यात मंगलदास बांदल यांनी देखील हजेरी लावली. 

त्यांनी काहीच वेळासाठी लावलेली ही हजेरी लोकसभेच्या निवडणुकीसाठी मोठी महागात पडली वंचित बहुजन आघाडी कडून त्यांना उमेदवारी देण्यात आली होती मात्र भाजपच्या मेळाव्यात दिसल्यामुळे त्यांची उमेदवारी थेट पक्षाकडून रद्द करण्यात आली. लोकसभेची उमेदवारी तर गेलीच मात्र आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी मंगलदास बांदल यांच्या पत्नी रेखा बांदल जोमात तयारीला लागले आहे. शिरूर हवेली विधानसभेसाठी त्या तयारी करतात मात्र यातच त्यांच्यावर ईडीची टांगती तलवार दिसते. यांच्या बंगल्यातून मोठा धबाड जप्त केले आणि त्याचमुळे मंगलदास बांदल यांची चर्चा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

Web Title: Just released from jail, now picked up by ED; Who is Mangaldas Bandal?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.