शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Exit Poll 2024 : खरी ठरली अजित दादांची भविष्यवाणी...! Exit Poll मध्ये एवढ्या जागा जिंकतंय महायुतीचं 'ट्रिपल इंजिन'
2
Exit Poll: पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार? मराठवाड्यात मविआच सरस ठरणार?
3
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
4
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
5
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
6
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
7
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
8
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
9
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
10
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
11
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
12
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
13
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
14
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
15
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
16
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
17
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
18
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
19
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
20
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी

दारूबंदी नुसताच दिखावा

By admin | Published: May 18, 2017 5:47 AM

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालनंतर राष्ट्रीय महामार्ग व राज्य मार्गालगतच्या पाचशे मीटर अंतरावरील परमीट रुम, बिअरबार देशी दारू, बिअर शॉपीची दुकाने

- लोकमत न्यूज नेटवर्कभोर : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालनंतर राष्ट्रीय महामार्ग व राज्य मार्गालगतच्या पाचशे मीटर अंतरावरील परमीट रुम, बिअरबार देशी दारू, बिअर शॉपीची दुकाने बंद झाली असली तरी हॉटेल, ढाब्यांवर छुप्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात अधिक पैसे घेऊन ग्राहकांची लूट करत अवैध दारू विक्री सुरु आहे. यामुळे शासनाच्या दारूबंदी हा नुसताच दिखावा आहे. नियम धाब्यावर बसवून दारूविक्री सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर १ एप्रिलपासून पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गवरील व राज्यमार्गावरील परमिट रुम, बिअर बार, देशी दारुची व बिअरशॉपीची ३१ दुकाने उत्पादन शुल्क विभागाकडुन सील करण्यात आली. यात भोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील महाड-पंढरपूर रोडवरील दोन बिअरबार व एक बिअर शॉपी अशी तीन, तर भोर कापूरव्होळरोड वरील दोन बिअरबार अशी पाच दुकाने राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील एक वाईन शॉप १४ बिअरबार आणी ११ बिअर शॉपी अशी २६, तर एकूण ३१ दुकानांना सील लागले आहे. याला दीड महिना झाला. मात्र, महामार्गावर आणि राज्य मार्गावरील सर्वच हॉटेल, ढाब्यांवर सर्रासपणे देशी-विदेशी दारूची विक्री छुप्या पद्धतीने सुरू आहे. .हे लोकमत प्रतिनिधीने केलेल्या प्रत्यक्षा पाहणीत हे सत्य समोर आले आहे. त्यामुळे शासनाच्या दारू बंदीची घोषणा कागदावरच राहिली आहे. शिरवळ ते कोल्हापुरपर्यंत महामार्गावरील सर्वच दारूची दुकाने बार, शॉपी बंद झाल्याने कुठेच दारू मिळत नाही. त्यामुळे दारुच्या बाटलीला सोन्याची किंमत आली आहे. - आत्तामात्र हॉटेल ढाबेवाले गुपचूप छुप्या पद्धतीने दारू विक्री करत आहे. शासनाच्या या कारवाईनंतर महाड-पंढरपूररोड वरील निगुडघर येथे अवैध देशी व हातभट्टी दारूवक्रिीला मोठ्या प्रमाणात उत आल्याचे चित्र पाहावयास मिळत असून, पोलीस याकडे काणाडोळा करीत आहेत.जादा किमतीने सर्रास विक्रीमहामार्गावरील दारूविक्री जरी बंद झाली असली, तरी हॉटेल, ढाब्यावर जादा किं मत देऊन दारूमिळत असून अनेक गाडीचालक शहरातील वाईन शॉपमध्ये दारू घेऊन गाडीत, तर अनेकजण हॉटेलात नेऊन पितात. त्यामुळे शासनाच्या महामार्गावरील दारु बंदीच्या निर्णयामुळ दारू पिणारे कमी झाले नसून अधिक पैसे घेऊन दारु विक्री जोरात सुरु आहे. दारु बंदीच्या निर्णयामुळे महसूल तर बुडालाच. मात्र, शासनाचा उद्देशही साध्य होताना दिसत नाही.वॉईन शॉपवर कारवाई करण्याची मागणी महामार्गावरील शिंदेवाडी ते शिरवळ पर्यत कुठेच दारु मिळत नसल्याने या ठिकाणचे सर्व तळीराम भोर शहरातील नवीआळी तील एका वॉईन शॉप मध्ये दारु खरेदीसाठी रांगा लागतात.सदरचा रस्ता रहदारीचा असल्याने दारु घेण्यास येणारे आपल्या वार चाकी च दोन चाकी गाड्या रस्त्यावरच लावत असल्याने सदरच्या वाईनशॉप समोर वाहातुकीची वारंवार कोंडी होते याकडे दुकान चालकाचे व पोलीसांचे दुर्लक्ष होत असुन वॉईनशॉपवर कारवाई करण्याची मागणी नागरिक करित आहेत.