शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
4
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
6
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
7
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
8
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
9
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
10
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
11
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
12
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
13
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
14
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
15
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
16
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
18
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
20
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक

’मोबाईल लोक अदालतीतून’ तडजोडीअंती खटले निघणार निकाली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2019 12:24 PM

लोकअदालतीमध्ये विविध प्रकारची दिवाणी, फौजदारी, धनादेश न वटल्याची प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाईचे दावे तडजोडीसाठी ठेवण्यात येतात.

ठळक मुद्देशासकीय, निमशासकीय,पोलिस खात्याकडील दाखलपूर्व व प्रलंबित प्रकरणे तडजोडीसाठी असणार नवीन उपक्रमाच्या माध्यमातून मध्ये नागरिकांना कायदेविषयक मार्गदर्शन केले जाणार

पुणे  : लोकअदालतीमध्ये विविध प्रकारची दिवाणी, फौजदारी, धनादेश न वटल्याची प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाईचे दावे तडजोडीसाठी ठेवण्यात येतात. यात आता जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या  ‘मोबाईल लोकअदालती’च्या माध्यमातून याप्रकारचे खटल्यांची तडजोड होऊन ते निकाली निघणार आहेत. जिल्हयाच्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन नवीन उपक्रमाच्या माध्यमातून मध्ये नागरिकांना कायदेविषयक मार्गदर्शन केले जाणार आहे. त्याप्रमाणे विविध बँका, वित्तीय कंपन्या तसेच मोबाईल-दूरध्वनी कंपन्यांकडील दाखलपूर्व प्रकरणे, विविध शासकीय, निमशासकीय, पोलिस खात्याकडील दाखलपूर्व व प्रलंबित प्रकरणेही तडजोडीसाठी ठेवली जाणार आहेत.  प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. बी. अगरवाल यांच्या हस्ते सोमवारी जिल्हा न्यायालयात अदालतीचे उद्घाटन करण्यात आले. गावो गावी जाऊन न्याय देता यावा, यासाठी फिरत्या लोक अदालतीच्या माध्यमातून "न्याय आपल्या दारी' ही सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून पुरविली जाते. 3 ते 29 जून दरम्यान जिल्हातील विविध ठिकाणी ही अदालत व शिबिर होणार आहे.  विविध कायद्यावरील माहिती, मोफत कायदेविषयक सहाय व सल्ला योजना, समुपदेशनाद्वारे प्रकरणांमध्ये समझोता तसेच गोरगरिबांसाठी उपलब्ध असलेल्या विविध योजना यांची माहिती तज्ज्ञांमार्फत नागरिकांना देण्यात येणार आहे, अशी माहिती प्राधिकरणाचे सचिव सी. पी. भागवत यांनी दिली. 

* लोकअदालतीचे ठिकाण व तारीख : पौड (ता. 4), कामशेत (ता. 6), जुन्नर (ता. 10), घोडेगाव (ता. 12), पेठ (ता. 12), तळेगाव ढमढेरे (ता. 17), खडकी (ता. 19), बेलवडी (ता. 21), वानेवडी (ता. 24), सासवड (ता. 26), कुसगाव (ता. 28). 

* शिबिराचे ठिकाण व तारीख : इंदोरी (ता. 7), जुन्नर (ता. 11), घोडेगाव (ता. 13), कडाची वाडी (ता. 15), विठ्ठलवाडी (ता. 18), खडकी (ता. 20), दळज नंबर 1 (ता. 22), शिरवळी (ता. 25), नारायणपूर (ता. 27), कुसगाव (ता. 29). 

टॅग्स :PuneपुणेMobileमोबाइलdigitalडिजिटलCourtन्यायालय