पुणे : शहरातील बहुचचित कात्रज चौकातील संजय गुगळे यांच्या मालकीची ४० गुंठासाठी जागेचे भुसंपादन करण्यात आले. त्यामुळे तब्बल २८ वर्षापासून प्रलंबित असलेल्या या जागेचे भुसंपादन झाले आहे. त्यामुळे कात्रज चौकातील वाहतुक कोंडी फुटण्यास मदत होणार आहे.
कात्रजच्या मुख्य चौकात सव्हनंबर १/2 संजय गुगळे यांच्या मालकीची जागा आहे. शहराच्या १९८७च्या विकास आराखडयानुसार तीस मीटर डिपी रोड आणि पार्कसाठी ६ हजार २०० चौरस मीटरसाठी बाधित होती. त्यानंतर २०१७च्या विकास आराखडयात हा रस्ता ३० मीटर ऐवजी ६० मीटरचा करण्यात आला. कात्रज कोंढवा रस्ता आणि पुणे सातारा रस्ता या दोन्ही मध्ये ही जागा बाधित होत आहे. या जागेबाबत संजय गुगळे हे उच्च न्यायालयात गेले होते. न्यायालयाने त्यांना मोबदला देण्याचे आदेश दिले होते.
त्यामुळे कात्रज चौकातील संजय गुगळे यांची जागा २०१३च्या नवीन भुसंपादन कायद्यानुसार करण्यात आले. गेल्या अनेक महिन्यापासुन या जागेच्या भुसंपादनाची प्रक्रिया सुरू होती. विशेष भूमि संपादन अधिकारी हर्षद घुले आणि अजिक्य पाटील यांनी भूसंपादन व व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त प्रतिभा पाटील यांच्याकडे जागेच्या ताब्याची कागदपत्रे दिली. यावेळी पालिकेचे उपअभियंता दिंगबर बीगर, शाखा अभियना रुपाली ढगे, आरेखक संतोष शिंदे उपस्थित होते.
भुसंपादनासाठी दिले २१ कोटी ५७ लाख
शहरातील बहुचचित कात्रज चौकातील संजय गुगळे यांच्या मालकीच्या जागेचे भुसंपादन होण्यासाठी माजी आयुक्त विक्रम कुमार, माजी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, पथ विभाग प्रमुख अनिरूध्द पावसकर , भुसंपादन विभागाच्या उपायुक्त प्रतिभा पाटील यांनी विशेष प्रयत्न केले. गुगळे यांच्या ४० गुंठासाठी जागेचे भुसंपादन करण्यात आले. त्यासाठी जागा मालकांला २१ कोटी ५७ लाख ६० हजार रूपये देण्यात आले.
वाहतुक कोंडीतुन सुटका होणार
कात्रज चौकात वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब झाली आहे. या वाहतुक कोंडीने पुणेकर हैराण झाले आहेत. पण कात्रज चौकातुन कोंढवाकडे जाणारा रस्ता अत्यंत अरूंद आहे. या अरूंद रस्त्याचे रूंदीकरण करणे गरजचे आहे. ही जागा ताब्यात मिळाली आहे. त्यामूळे वाहतुक कोंडीतुन दिलासा मिळणार आहे.