पहिल्यापासून त्यांचे कुटुंबीय एकत्र आहेत. आताच सगळे कामधंद्यांमुळे वेगळे झाले. त्या नगरसेवक असताना महिला बाल कल्याण समितीची दोन वेळा अध्यक्ष होत्या. एकदा शहर सुधारणा समितीवर सदस्य होत्या.
राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तुपे पाटील यांनी खूप सहकार्य केले. सर्व पक्षातल्या नगरसेवकांचे, कार्यकर्त्यांचे चांगले संबंध व सहकार्य आहे, असे त्या सांगतात.
सर्वांना आपलेसे करून घेऊन काम करून घेणे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रामधूनच शिकले. अभिजित कदम कात्रज परिसरातील काँग्रेसचे. त्यांना त्या नुकत्याच म्हणाल्या की यंदा आपण दोघं निवडणुकीला उभे राहू आणि दोघे निवडून येऊ. त्या म्हणाल्या ''''''''अभिजित कदम खूप चांगला माणूस आम्ही दोघं महानगरपालिकेमध्ये एकत्र जात होतो एकत्र काम करत होतो. त्यामुळे अनेक कामं मला करून घेता आली.'''''''' राजकारणामध्ये आपण एक शिकलो ते म्हणजे समोरच्या शत्रुला बेसावध ठेवून, घायाळ करून आपले काम करून घ्यायचं, आणि कोणी आडवा आला की त्याला धडा शिकवायचा. ही रणनीती मी शिकून घेतली. जर मी वाद घालत बसले असते तर काही लोकांनी मला काम करू दिले नसते, अशी त्यांची धारणा आहे.
लोकांचे काम फक्त शिवसेनाच करू शकते, असेही त्या म्हणतात. सगळ्या प्रकारच्या लोकांशी जुळवून घेतल्यामुळे माझे काम चांगले होते, आणि कुणी कामांमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करत नाही. महानगरपालिकेत अधिकाऱ्यांशी, ठेकेदारांशी चांगले संबंध आहेत. एका आंदोलनासाठी महानगरपालिकेमध्ये नुकत्याच गेलेल्या असताना या लोकांनी त्यांना भेटायला यावं,अशी विनंती केली. त्या बरीच वर्ष महानगरपालिकेत गेलेल्या सुद्धा नाहीत. पुढच्या वेळी निवडून आले की भेटेन, असं गंमतीनं सांगून त्या परतल्या.
गेल्या निवडणुकीमध्ये यश मिळालं नसलं तरी त्या निराश नाहीत. निवडणुकांमध्ये हार-जीत होत असतेच आणि बेईमानी करून निवडून आलेल्यांना त्या निवडून आलेले असं म्हणत नाहीत असं त्यांचं मत. पराजयाचं आपल्याला काही वाटलं नाही तरी लोक माझ्यासाठी रडत होते, हे महत्वाचं असं त्यांचं म्हणणं आहे.
कात्रज परिसरात अनेक लोकांनी अर्धा,एक गुंठा जागा घेऊन घरं बांधली. तो सारा मध्यममार्गी वर्ग. तो सहन करतो, त्यामुळं त्याला त्रास दिला जात होता. जो बंड करतो त्याला त्रास दिला जात नाही. त्यामुळे कल्पनाताई निवडून आल्यानंतर हे सगळे प्रकार बंद झाले.
आज त्यांचे सर्वपक्षीय संबंध इतके चांगले संबंध आहेत की विरोधी पक्षात असलेला एखादा उमेदवार अर्ज भरण्यापूर्वी थोरवे पती-पत्नींचे आशीर्वाद घेऊन जातो.
लोकांचे काम करायचे असेल तर एखाद्या पक्षाचा पाठिंबा आपल्यामागे असलाच पाहिजे. आपल्या मागे शिवसेनेचं भक्कम पाठबळ आहे. त्यामुळे लोकांची कामं लवकर होऊ शकतात. शिवसेनेमध्ये महिलांना खूप आदराचं स्थान आहे गेल्या तीस वर्षांपासून अगदी कमी वयामध्ये आपण शिवसेनेच्या माध्यमातून राजकारणात आहोत, परंतु आतापर्यंत कसलाही वाईट अनुभव आला नाही. महिलांना राजकारणात त्रास होतात असं म्हटलं जातं परंतु त्यांना तसा कसलाही अनुभव आला नाही. राजकारणातील महिला चांगल्या नसतात असं म्हटलं जातं पण तसाही अनुभव कल्पनाताईंना नाही. राजकारण वाईट अजिबात नाही असं त्यांना वाटतं.
लोकांची खूप कामं आपल्याला एखाद्या राजकीय पक्षाच्या माध्यमातून करता येतात. याचा अनुभव घेतला. तीन वेळा यश नाही मिळालं तरी त्या काम करत राहिल्या.
कात्रज भागामध्ये पूर्वी आठ दिवस पाणी नसायचं. आता लोकांना मिनरल वॉटर सारखं स्वच्छ पाणी रोज व पुरेशा दाबाने मिळत आहे. आता भरपूर पाणी उपलब्ध असतं. चौथ्या मजल्यापर्यंतही लोकांना पाणी मिळू लागलेलं आहे.
आजही सकाळपासून रात्रीपर्यंत ताईकडे लोकांचा, विशेषता महिलांचा राबता असतो. मुंबईत कडक सुरक्षा व्यवस्था तैनात असताना ''''''''मातोश्री''''''''वर पुण्यातल्या सर्व महिलांना आत मध्ये साहेबांच्या भेटीसाठी घेऊन गेल्या होत्या, तो किस्सा आजही सांगितला जातो.
''''''''मातोश्री'''''''' बाहेर पुण्यातल्या महिलांना आजही अडवलं गेलं तर कल्पनाताई थोरवे यांना फोन लावा त्यांनी सांगितले तरच आत मध्ये सोडतील, अशी महिला कार्यकर्त्यांची भावना असते.