शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
3
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
4
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
5
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत
6
नवाब मलिकांवरून अजितदादा गटाने भाजपा-शिंदे गटाला फटकारलं; "कुणाला काही वाटू दे..."
7
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
8
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार'
9
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
10
Sameer Bhujbal : दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
11
विराट कोहलीसाठी सिक्सर किंग युवीनं शेअर केली खास पोस्ट
12
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
13
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीचा मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
14
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता
15
बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!
16
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
17
...यासाठी बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंना माफ करणार नाहीत; संजय राऊत भडकले
18
आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार!
19
शुक्राचा गुरु राशीत प्रवेश: १० राशींवर धनलक्ष्मी कृपा, अचानक धनलाभाचे योग; शुभ-लाभाचा काळ!
20
Devayani Farande : मध्य नाशिक मतदारसंघात बंडखोरांच्या माघारीचा भाजपाच्या देवयानी फरांदेंना फायदा

कमलबाई चोरडिया यांचे वृद्धापकाळाने निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 11:41 PM

प्रवीण उद्योग समुहाला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला ह्यमसालाह्णहा मराठी चित्रपटही कमलबाई यांच्या जीवन प्रवासावर आधारलेला होता.

पुणे : प्रवीण उद्योग समुहाचा पाया घालणाऱ्या कमलबाई हुकमीचंद चोरडिया (वय ८६) यांचे मंगळवारी सायंकाळी सात वाजता वृध्दापकाळाने निधन झाले. बुधवारी सकाळी दहा वाजता स्वागत बंगला, मोतीबाग सोसायटी येथून अंत्ययात्रा निघेल. नवी पेठेतील वैकुंठ स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली आहे.कमलाबाई त्यांच्या पश्चात चार मुले राजकुमार, प्रवीण, प्रदीप आणि धन्यकुमार तसेच विशाल, आनंद, अमित आणि गौरव हे नातू यांच्यासह नातवंडे आणि पतवंडे असा परिवार आहे.पुण्यातील भंडारी कुटुंबातील असलेल्या कमलबाई यांचा ६८ वर्षांपूर्वी हुकुमीचंद चोरडिया यांच्याशी विवाह झाला. हुकमीचंद हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरचे आहेत. वडगाव-धायरी परिसरामध्ये चोरडियांचे किराणा मालाचे दुकान होते. दोघांनी सोबतीने १९६२ साली प्रवीण उद्योग समुहाचा पाया रचला. सुरवतीला ह्यआनंद मसालाह्ण या नावाने या व्यवसायात पाऊल ठेवले. कमलाबाई यांच्या हाताला चव असल्याने त्यांनी इतरांशी स्पर्धा न करता आपला वेगळा ब्रॅँड प्रस्थापित केला. कमलाबाई स्वत: दररोज २५-२५ किलोंचा मसाला कुटून देत असत. तो मसाला हुकमीचंद सायकलवर घेऊन सोलापुरात विकायला नेत. काही काळानंतर पुण्यात येऊन त्यांनी व्यवसाय सुरू केला. त्यांच्या या कारकीर्दीवर ह्यबिकट वाट यशाचीह्ण या नावाने त्यांच्या स्नुषा मधुबाला चोरडिया यांनी लिहिलेले आत्मचरित्रपर पुस्तकही प्रसिद्ध आहे. प्रवीण उद्योग समुहाला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला ह्यमसालाह्णहा मराठी चित्रपटही कमलबाई यांच्या जीवन प्रवासावर आधारलेला होता.अत्यंत कुटुंबवत्सल असलेल्या कमलबाई यांना सर्वजण ह्यबाईह्णया आदरार्थी नावाने संबोधत असत. विविध सामाजिक संस्थांशी देखील त्या अनेक वर्षे जोडल्या गेल्या होत्या.