पुणे : गोव्यात होणाऱ्या संत साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी संत साहित्याचे गाढे अभ्यासक आणि गुरूकुल प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अशोक कामत यांची निवड करण्यात आली आहे. श्री संत सोहिरोबानाथ अंबिये यांच्या स्मृतीदिनानिमित्त गोवा मराठी अकादमीच्या वतीने गोव्यात २५ व २६ मार्च रोजी हे संमेलन होईल. या संमेलनात संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे, डॉ. सतीश बडवे, सुनील चिंचोळकर, प्रा. गोपाळराव मयेकर, डॉ. म. अ. कुलकर्णी, डॉ. धोंडिबा कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत. तसेच संमेलनात ‘ज्ञानदेवे रचिला पाया’, ‘लोकनाथ-एकनाथ’, ‘मुख हरीकथा निरूपण ते राजकारण’, ‘नाचू कीर्तनाचे रंगी’, ‘तुका आकाशाएवढा’ आदी विषयांवर परिसंवाद होणार आहेत. (प्रतिनिधी)
संत साहित्य संमेलन अध्यक्षपदी कामत
By admin | Published: March 20, 2017 3:22 AM