पाटस : कानगाव (ता. दौंड) येथील राज्यव्यापी आक्रोश आंदोलक शेतकºयांनी शासनाचा निषेध म्हणून रविवारी शीर्षासन आंदोलन केले. आजचा आंदोलनचा १८ वा दिवस होता. दररोजचे साखळी उपोषण शेतकरी कायम करीत आहेत.कानगावच्या आंदोलनाकडे शासनाने पूर्णपणे डोळेझाक केली असल्याने आंदोलक संतप्त झाले आहेत. शासनाने आर्थिक कोंडी करून शेतकºयांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा केला आहे. तेव्हा शासनाचा निषेध करीत शेतकºयांनी शीर्षासन आंदोलन केले.आंदोलनस्थळी विविध मान्यवर, राजकीय आणि सामाजिक संस्था पाठिंबा देत आहेत. त्यानुसार रविवारी आंदोलनस्थळी फुले शाहू मंचाचे अध्यक्ष अॅड. संभाजीराव बोरूडे यांनी भेट दिली. या वेळी ते म्हणाले की, शेतकरी आर्थिक कोंडीत सापडलेला आहे. अशा परिस्थितीत शासनाने शेतकºयांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे. भविष्यात शेतकºयांनी केवळ आंदोलने करून चालणार नाही तर शेतकºयांनी शासनाच्या विरोधात कायद्याची लढाई केली पाहिजे.>...ते विठ्ठलाला मागतातकानगाव येथे जाहीर भाषणात बोरूडे म्हणाले की , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आषाढीवारीला विठ्ठलाला साकडे घातले की, राज्यातील शेतकºयांच्या अडचणी दूर कर. फार फार तर परमेश्वर शेतकºयांना आशीर्वाद देईल; मात्र अडचणी दूर करण्याचे मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे. परंतु ते त्यासाठी विठ्ठलाला साकड घालतात.
शासनाच्या निषेधार्थ कानगावला ‘शीर्षासन’, साखळी उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 12:12 AM