पुणे : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैयाकुमार येत्या २४ एप्रिल रोजी पुण्यात सभा घेणार आहे. तसेच तो भारतीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्थेतील विद्यार्थ्यांचीही भेट घेणार आहे. या वेळी फर्ग्युसन महाविद्यालय व रानडे इन्स्टिटूुटमधील विद्यार्थीही सहभागी होणार आहेत. पुरोगामी विद्यार्थी युवक संघर्ष समितीच्या वतीने पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. पुणे येथे दोन आठवड्यांपूर्वी विविध पुरोगामी, धर्मनिरपेक्ष प्रगतिशील विचारांच्या विद्यार्थी व युवक संघटनांनी एकत्र येऊन पुरोगामी विद्यार्थी युवक संघर्ष समितीच्या माध्यमातून सभेचे नियोजन केले जात आहे. (प्रतिनिधी)
कन्हैयाकुमार २४ रोजी पुण्यात
By admin | Published: April 16, 2016 3:53 AM