पुणे : इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्चच्या मार्गदर्शक सुचनांनुसार कार्यवाही करून, कोरोनाविषयक चाचण्यांचे प्रमाण वाढवावे अशा सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी प्रशासनास दिल्या. तसेच खासगी रूग्णालयातील कोरोनाबाधितांवरील उपचारांसाठी अवाजवी शुल्क आकारणी केली जाणार नाही यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी असेही ते म्हणाले.शरद पवार यांच्या उपस्थितीत कोरोना प्रादुर्भाव निर्मुलन आढावा बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात संपन्न झाली. त्यावेळी त्यांनी कोरोना उपाययोजना संदर्भात माहिती घेऊन काही सूचना केल्या. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार गिरीश बापट, श्रीरंग बारणे, वंदना चव्हाण, अमोल कोल्हे तसेच शहरातील आमदार व जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.पवार म्हणाले, कोरोना संर्सगास आळा घालण्यासाठी जास्तीत जास्त चाचण्या करून संबंधित बाधितावर वेळेवर उपचार देणे आवश्यक आहे. अशावेळी शहरात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जाहिर केलेल्या प्रतिबंधित क्षेत्राचाही नियमित आढावा घेऊन त्यात सुधारणा करणे जरूरी आहे. अनेक जण खाजगी रूग्णालयामंध्ये उपचारासाठी दाखल होत असताना त्यांच्याकडून अवाजवी शुल्क आकरणी केली जात आहे. अशावेळी या अवाजवी शुल्क आकारणीला रोखण्यासाठी आवश्यक की कार्यवाही करणे जरूरी आहे.
Corona virus : कोरोनाविषयक चाचण्यांचे प्रमाण वाढवा, रुग्णांवर लवकरात लवकर उपचार होणे आवश्यक : शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 6:32 PM
अवाजवी शुल्क आकारणी केल्यास कार्यवाही करणार
ठळक मुद्देप्रतिबंधित क्षेत्राचा रोज आढावा घेऊन सुधारणा करणे गरजेचे