रयत शिक्षण संस्थेच्या भीमाशंकर विद्यामंदिर व टी. एस. बोराडे कला व विज्ञान महाविद्यालय शिनोली येथील डॉ. पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील याची १३४ वी जयंती कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.
शिनोली (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर विद्यामंदिर व टी. एस. बोराडे कला व विज्ञान महाविद्यालय येथे पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील याची १३४ वी जयंती कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी स्कूल कमिटी सदस्य हरिश्चंद्र हिंगणे, कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य व ग्रामविकास मंत्रालय महाराष्ट्र राज्य माजी उपसचिव डी. बी. बोऱ्हाडे होते. यावेळी तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष मधुकर अप्पा बोऱ्हाडे, भगवान बोऱ्हाडे, अरुण बोऱ्हाडे, माजी प्राचार्य भाडले, माजी सैनिक दामुराजे बोऱ्हाडे उपस्थित होते.
विद्यालयाचे प्राचार्य डी. एच. चत्तर यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन एस. डी. गवारी आणि पर्यवेक्षक एस. कांबळे यांनी केले. आभार आर. एस. पिंगळे यांनी मानले.
--
फोटो क्रमांक- २२
सोबत-२२डिंभे कर्मवीर जयंती
ओळ - कर्मवीर भाऊराव पाटील जयंती प्रसंगी बोलताना ग्रामविकास मंत्रालयाचे माजी उपसचिव डी. बी. बोऱ्हाडे
छायाचित्र- कांताराम भवारी.