यावेळी कारखान्याच्या व्हाइस चेअरमन पद्माताई भोसले, तसेच सर्व संचालक मंडळ, निरा-भिमा सह.साखर कारखान्याचे चेअरमन लालासाहेब पवार, व्हाइस चेअरमन कांतीलाल झगडे, ॲड. कृष्णाजी यादव यांचे उपस्थितीमध्ये झाली.
विषयपत्रिकेवरील विषयांचे वाचन कारखान्याचे कार्यकारी संचालक बाजीराव सुतार यांनी केले व त्यास सभासदांनी हात वर करून मंजुरी दिली. विषयपत्रिकेवरील सर्व विषयांच्या मंजुरीनंतर सभासदांनी कारखान्यासाठी काही विधायक सूचना केल्या. त्यानंतर, कारखान्याच्या उपाध्यक्षा पद्माताई भोसले यांनी गाळप हंगामाचा सविस्तर आढावा सादर केला.
कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी केंद्रशासनाचे इथेनॉल व साखर निर्यात धोरणासंदर्भात विशेष अभिनंदन करून केंद्र सरकारकडे समक्ष भेट घेऊन आणखी मागण्या करणार असल्याचे त्यांनी सूचित केले. आभार कारखान्याचे संचालक राहुल जाधव यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यालयीन अधीक्षक शरद काळे यांनी प्रयत्न केले.
कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याची ३५वी सर्वसाधारण सभा ऑनलाइन पार पडली.