बिजवडी : यंदाच्या सन २०१८-१९च्या ऊस गळीत हंगामात गाळप होणाऱ्या उसाला इतर साखर कारखान्यांपेक्षा जादा दर निश्चित देणार आहे. तरी, सर्व सभासदांनी आपला सर्व ऊस यंदा कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याला घालावा. तसेच, कर्मयोगी २०२० पर्यंत कर्जमुक्त करू, असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थित सभासदांना केले.कर्मयोगी साखर कारखान्याची ३३वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी (दि. २२) दुपारी एक वाजता महात्मा फुले माध्यमिक विद्यालय बिजवडी (ता. इंदापूर) प्रांगणात आयोजित केली होती, त्या वेळी सभेला पाटील बोलत होते. सभेचे प्रास्ताविक कारखान्याच्या उपाध्यक्षा पद्मा भोसले यांनी केले. तर, सभेचे इतिवृत्त व नोटीस कारखान्याचे कार्यकारी संचालक बाजीराव सुतार यांनी केले.या वेळी पाटील म्हणाले, की कारखान्याची गाळप क्षमता वाढविण्यासाठी एनसीजीसीकडून साडेचार टक्के व्याजदराने ४५ कोटी रुपये कर्ज घेतले होते. त्याचे सर्व हप्ते वेळेत फेडले आहेत. तसेच, इतर संस्थांकडून १३२ कोटी कर्ज घेतले होते. ते सर्व कर्ज सण २०२०च्या गळीत हंगामात फेडणार आहे. सन २०२०मध्ये कारखाना कर्जमुक्त करू, अशी ग्वाही पाटील यांनी या वेळी उपस्थित सभासदांना दिली.सन २०१७-१८च्या ऊस गळीत हंगामात ज्या शेतकºयांचा ऊस सुरुवातीला आला. त्यांना २ हजार ४०० रुपये हप्ता दिला; परंतु नंतर साखरेचे दर २ हजार ३०० रुपयांपर्यंत खाली आल्यामुळे नंतर आलेल्या उसाला २,२०० रुपये, तर काहींना २ हजार १०० रुपये दर दिला. त्या सर्व शेतकºयांच्या उसाला लवकरच राहिलेला हप्ता दिला जाईल, असे पाटील यांनी सांगितले.तसेच, कारखाना वसाहतीत आरओ सिस्टीमचे उद्घाटन या वेळी पद्मा भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यालयीन अधीक्षक शरद काळे यांनी सूत्रसंचालन केले. उपस्थित सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना कारखाना प्रशासनाने उत्तरे दिली.गेल्या वर्षी साखरेचे दर एकदम कोसळल्यामुळे साखरेच्या प्रत्येक पोत्याला किमान १ हजार रुपये कमी मिळू लागले; त्यामुळे कर्मयोगीला ११० कोटी रुपयांचा साखरविक्रीमध्ये तोटा झाला. कारखान्याच्या २ हजार ९०० सभासदांनी कारखाना स्थापन झाल्यापासून आपल्या उसाचे एक टिपरूदेखील दिलेले नाही, अशी औपरोधिक टीका पाटील यांनी या वेळी केली. त्यामुळे साखरेचे भाव आणखी कोसळणार आहेत. त्यासाठी आपल्या देशात किमान ८० लाख टन कच्ची साखर तयार करावी. ती साखर इंडोनेशिया, चीन आणि बांगलादेश घेण्यास तयार आहेत. त्यामुळे साखर शिल्लक राहणार नाही व साखरचे दरही वाढतील, अशी मागणी या वेळी पाटील यांनी केली.- हर्षवर्धन पाटील
‘कर्मयोगी’ २०२० पर्यंत कर्जमुक्त करणार- हर्षवर्धन पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 11:24 PM