लोकमत न्यूज नेटवर्क
इंदापूर : इंदापूर तालुक्याचे लोकनेते कर्मयोगी कै. शंकरराव पाटील यांनी इंदापूर तालुक्याला राजकीय, सामजिक, शैक्षणिक संस्कृती दिली. त्याचबरोबर तालुक्यातील उपेक्षित घटकांना वेळोवेळी न्याय देण्याचे कार्य त्यांनी केले. त्यामुळे कै. शंकरराव पाटील इंदापूर तालुक्यातील जनतेसाठी खऱ्या अर्थाने दीपस्तंभ आहेत, असे मत इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा यांनी व्यक्त केले.
लोकनेते कै. शंकरराव (भाऊ) पाटील यांच्या जयंतीनिमित्त इंदापूर आठवडे बाजारामध्ये रविवार (दि ७) रोजी भाऊंच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बाजारातील शेकडो नागरिकांना मास्क वाटप करून अनोखे अभिवादन करण्यात आले.
यावेळी इंदापूर नगपरिषदेच्या नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा, सायरा आतार, सुषमा पाटील यांच्या सहकार्याने व आयोजक संजय शेलार व सहकारी मित्र , प्रशांत मामा उंबरे युवा मंच, नकुल जांगीड, अमोल माने, ज्ञानदेव डोंगरे, अण्णा चोपडे, नागेश तरटे, प्रवीण हरणावळ, बापू पाडुळे, दत्ता गुप्ते व आदी उपस्थित होते.
यावेळी कै. शंकरराव पाटील यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला व कोरोना काळात आपली स्वतःची आणि समाजाची कशी काळजी घेता येईल याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजक संजय शेलार यांनी सर्वांचे आभार मानले.
फोटो ओळ : इंदापूर आठवडी बाजारात मास्क वाटप करताना नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा व मान्यवर.